शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त भागाचे जलदगतीने पंचनामे करा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 17:37 IST

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात नागरिकांच्या घरांचे व शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजोरदार पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस व फळबागा अडचणीत

कळस : पुणे जिल्ह्यासह इंदापुर तालुक्यात परतीच्या वादळी पावसाने द्राक्षे,डाळिंब, ऊस व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे व शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. यासर्व नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तालुक्यातील प्रशासनाला दिल्या आहेत.याबाबत ‘लोकमत’शी बोलताना भरणे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यासह तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस  व फळबागा अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे व जमिनीचे बांध वाहुन गेल्याने नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची दुरावस्था झाली आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र इंदापूर शहर व तालुक्यातील काही भागांची पाहणी केली आहे. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिकांसह घरे व पशुधनाचेही पंचनामे होणार आहेत.

जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने कार्यवाही चालु केली आहे. नागरिकांनी आपले तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक याच्यांशी संपर्क करून या नुकसानग्रस्त नागरिकांनी आपले नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत, कोणीही  वंचित राहणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. सांयकाळ पर्यंत नजर अंदाज आकडेवारी समजेल. अजुनही पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.————————————————...अतिवृष्टीने दोन्ही घटक कोलमडलेकोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे अगोदरच  लहान मोठा शेतकरी,व्यापारी अडचणीत सापडला आहे. त्यातच झालेल्या या अतिवृष्टीमुळे  शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही घटक पुरते कोलमडुन गेले आहेत.त्यामुळे विभागीय आयुक्तांनी कोणत्याहि आदेशाची वाट न पाहता.सरसकट पंचनामे करण्याचे आदेश काढावेत,अशी मागणी भाजपचे भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी केली आहे. ———————————

टॅग्स :IndapurइंदापूरRainपाऊसFarmerशेतकरीministerमंत्री