शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी अनुभवला रिगाटाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:14 IST

गेल्या नव्वद वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने रिगाटा या महाेत्सवाचे अायाेजन करण्यात येते. मुळा-मुठेच्या संगमावर, संगमवाडी येथील नदी पात्रात बाेटीच्या सहाय्याने डाेळे दीपवणारी प्रात्याक्षिके केली जातात.

ठळक मुद्देगेल्या नव्वद वर्षांपासून करण्यात येते या महाेत्सवाचे अायाेजनविविध प्रात्यक्षिकांनी फेडली प्रेक्षकांच्या डाेळ्यांची पारणे

पुणे : मुळा-मुठेच्या संगमावर बोटीतून केलेली थरकाप उडवणारी प्रात्यक्षिके, आकाशात होणारी आतषबाजी, त्यात होणारा विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजराने दिलेला प्रतिसाद,अश्या वातावरणात पुणेकरांनी लुटला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिगाटा या महोत्सवाचा आनंद.     अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने गेल्या ९० वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पुणेकर रसिकही आवर्जुन हजेरी लावतात. मुळा-मुठाच्या संगमावर, संगमवाडी येथील नदी पात्रात या महाेत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या तीन महिन्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी या महोत्सवाची तयारी करत होते. रविवारी झालेल्या या महोत्सवात ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध प्रकारच्या बोटींच्या सहाय्याने नदीमध्ये विविध आकार तयार करण्यात आले. यंदा, भारताचा संपूर्ण इतिहास, इंग्रजांनी भारतावर केलेले आक्रमण ते विविध जातींमध्ये विभागलेला समाज. आणि या समाजाला जाती-पातीच्या पलिकडे एकसंथ बांधण्याचा विचार या प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आला. विद्यार्थी जीवाची बाजी लावून प्रात्याक्षिके करत होते. त्याचबरोबर प्रात्याक्षिकांना साजेशी अशी आताषबाजी यावेळी करण्यात येत होती. नदीमध्ये लावलेल्या आगीचे प्रात्याक्षिके पाहताना प्रेक्षक भारावून गेले होते. बोटींची टक्कर होणार नाही याची काळजी घेत अंधारात विद्यार्थी आपली कला दाखवत होते. संगमवाडी पुलावर उभे राहूनही अनेक नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.  

   या महोत्सवामध्ये एकूण पाच विविध प्रकारची प्रात्याक्षिके केली जातात. त्यातील चार ही पाण्यात केली जातात, तर एक प्रात्याक्षिक नदीच्या दुसऱ्या बाजूला केले जाते. या प्रात्याक्षिकामध्ये मशाल डान्स केला जातो. यासाठी जुन्या मशालींचा वापर केला जातो. या महोत्सवाच्या व्यतिरिक्त इतर वेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बोट क्लबच्या माध्यमातून विविध स्पर्धांची वर्षभर या ठिकाणी तयारी करण्यात येते. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिकेही मिळवली आहेत.  

टॅग्स :Puneपुणेriverनदीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी