शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी टोळी पकडली

By admin | Updated: March 1, 2015 01:01 IST

दुपारच्या वेळी नागरिकांच्या घरी जाऊन भांडी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.

पुणे : दुपारच्या वेळी नागरिकांच्या घरी जाऊन भांडी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून १४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.मुकेशकुमार गोपाळकुमार साह (वय २७), राजेशकुमार वासुदेव साह (वय २८), दिलीपकुमार सरजुग साह (वय २९), रवीकुमार सियाराम गुप्ता (वय ३२), सुनिलकुमार सत्यनारायण साह (वय २९, सर्व रा. पनवेल, जि. रायगड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुळचे भागलपुरचे, बिहारचे रहीवासी आहेत. मुकेशकुमार याच्याबाबत खब-यामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. आरोपींनी सहकारनगर, वाकड, वारजे माळवाडी, दत्तवाडी, समर्थ, विश्रांतवाडी, खडक, भोसरी, स्वारगेट, मुंढवा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये १४ गुन्हे केले आहेत. आरोपींकडून २६६ ग्रॅम सोन्याचे दागिने दोन मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा एकूण ८ लाख २१ हजार २३९ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.आरोपी २०१३ पासून तळोजा एमआयडीसीमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये रहात होते. मुंबई, पुणे परिसरात सलग गुन्हे करुन ते पुन्हा बिहार येथील मुळ गावी जात होते. त्यांच्या खोलीमधून भांडी आणि सोने पॉलीश करण्याची पावडर मिळाली असून ही पावडर अहमदाबाद येथून विकत आणत होते. पुण्यासह नवी मुंबई, ठाणे, सांगली,सातारा, कोल्हापुर, नाशिक, मुंबईमध्येही हात साफ केला आहे. आरोपींना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)