शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी टोळीचा म्होरक्या काडय्याला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 19:56 IST

काडय्या याच्यावर कर्नाटक येथील पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर कोल्हापूर पोलिसांकडे जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून त्याची कर्नाटक राज्यात दहशत आहे.

ठळक मुद्देमोक्का न्यायालय : कर्नाटक-कोल्हापूर परिसरात घरफोडी-जबरी चोरीचे अनेक गुन्हेआरोपींच्या टोळीने भर दुपारी त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांच्याकडील ३ लाख ७० हजारांची रक्कम लुटली.

पुणे : बँकेतून पैसे काढून दुचाकीवर निघालेल्या दूध संस्थेच्या सचिवाला मारहाण करून लुटल्या प्रकरणी कोल्हापूर येथील काडय्या पुजारी टोळीच्या म्होरक्यासह दोघांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिले. काडय्या शिवलिंगय्या पुजारी (रा. बस्तवाड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि कल्लाप्पा बाळाप्पा मेलमट्टी (रा. इंगळी ता. हुक्केरी जि. बेळगाव) अशी पोलीस कोठडी दिलेल्या आरोपींचे नावे आहेत. इरय्या चंदय्या मटपती (वय ३२),  गुलाबसाहब आप्पासाहब मुलतानी (वय ५५), मेहबुब बाबालाल मुलतानी (वय २७, तिघेही रा. हुक्केरी, बेळगाव), परशुराम ऊर्फ परसु केंचाप्पा मांग (वय ३६, बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज, कोल्हापूर) यांच्यावरही मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी त्यांची कोठडी घेतली होती. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. बाळू महादेव राजगोळे (वय ३५, रा. बुगडीकट्टी, ता. गडहिंंग्लज, कोल्हापूर) यांनी नेसरी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २२ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लिंगनूर ते मुंगूरवाडी येथील महादेव मंदिराजवळ घडली. काडय्या याच्यावर कर्नाटक येथील पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे दाखल आहेत. तर कोल्हापूर पोलिसांकडे जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून त्याची कर्नाटक राज्यात दहशत आहे. तर कल्लाप्पा मेलमट्टी याच्यावर कर्नाटक येथील विविध पोलिस ठाण्यात सात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात एक गुन्हा दाखल आहे. फिर्यादी राजगोळे महालक्ष्मी दूध संस्थेत सचिव म्हणून काम करतात. त्यांच्या सोबत असलेले मित्र दत्तू गंगाजी पाटील हे हनुमान दूध संस्था, गुडलकोप बुगडीकट्टी या संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही दूध संस्थेचे खाते हेब्बाळ-जळद्याळ येथील बँक आॅफ इंडियामध्ये आहे. बँकेत कामकाजासाठी दोघे एकाच दुचाकीवरून ये-जा करत असतात. घटनेच्या दिवशी बँकेतून ३ लाख ७० हजार रुपयांची रक्कम काढून परतत असताना लिंगनूर ते मुंगूरवाडी येथील रोडवर आरोपींच्या टोळीने भर दुपारी त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांच्याकडील ३ लाख ७० हजारांची रक्कम लुटली.टोळीच्या म्होरक्यासह दोघांना पुणे शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडील चोरीची रक्कम हस्तगत करायची आहे. गुन्हा केल्यानंतर दोघे कोठे फरार झाले होते ? याचा तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. 

टॅग्स :PuneपुणेKarnatakकर्नाटकCrimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय