शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

पुण्यातील संचारबंदी केलेल्या भागातील नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य कुठेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:22 IST

पोलिसांकडे दुर्लक्ष करून नागरिक वाहनांवर फिरतात

ठळक मुद्देसकाळच्या वेळी सुरू असते रहदारी 

पुणे : कोरोनाची लागण शहरातील काही भागात सुरू झाल्याने प्रशासनाने तो भाग सील केला आहे. तसेच त्याठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र अनेकजण सकाळच्या वेळी वाहनांवर घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. दुपारी देखील शहराच्या मध्यवर्ती भागात काहीजण विनाकारण गाडीवर फिरत आहेत. पोलिसांनी सातत्याने आवाहन करून देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही भाग सील करण्यात आले आहेत. तर इतर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण सील केलेल्या भागात अजूनही कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात आले नाही. असे पाहणीतून दिसून आले. कर्फ्यु भागात शहरातील पेठांचाही समावेश आहे. त्यामध्ये सकाळच्या वेळेत नागरिक बाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. नाना पेठ, भवानी पेठ या भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. पण लोकांना त्याचा काही फरक पडत नाही. पवळे चौकातून कुंभारवाडयाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच त्या भागात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. म्हणून या भागातील नागरिक रस्त्यावर येत नाहीत. पण अलीकडच्या भागात अजूनही नागरिकांची वर्दळ दिसून येते. तर सकाळच्या वेळेत भाजीपाला घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. अनेक गल्लीबोळ प्रवेश बंद केले असल्याने नागरिकांना एका गल्लीतून दुसरीकडे जाता येत नाही. त्यामुळे दोन दिवसापूर्वीच्या वर्दळीपेक्षा आजचे प्रमाण कमी होते. नाना पेठेतही रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व काही सील करण्यात आले आहे. या भागात दुपारी १२ ते २ यावेळेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. परंतु भाजीपाला मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिक रात्रीच्या वेळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडत आहेत. तर सकाळच्या वेळेत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची धांदल उडत आहे. सायंकाळनंतर पोलिसांची नजर चुकवून नागरिक घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे 

* लॉकडाऊन सर्वांनी घरात बसावे यासाठी करण्यात आले आहे. आता पुन्हा ते वाढवण्यात आले आहे. ते का यामागील कारणे जे अजूनही शिस्तीचे पालन करत नाहीत त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. विशेषत: तरुणांनी काळजी घ्यावी. आता वेळ सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची आहे. असे असताना आपली एखादी चूक सर्वांसाठी महागात पडू शकते. याचा विचार करायला हवा. - हरिभाऊ डोके (ज्येष्ठ नागरिक, ) 

* मंडई, दगडूशेठ परिसरातही सकाळच्या वेळेत नागरिक गाडीवर फिरताना दिसून आले आहेत. हा परिसर कर्फ्युमध्ये येत नसला तरी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस या भागातील नागरिकांना सातत्याने घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. तसेच गल्ल्यांमध्ये बांबू आणि लोखंडी रॉड टाकून प्रवेश बंद करण्यात आले आहेत. या गोष्टीला नागरिकाडून सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस