प्रकाश शंकरराव वाघमारे यांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर

By Admin | Updated: April 27, 2017 17:05 IST2017-04-27T17:05:05+5:302017-04-27T17:05:05+5:30

पुणे ग्रामीण पोलीस दलातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश शंकरराव वाघमारे यांना सन 2016 या वर्षाचे

Public Prosecutor Shankarrao Waghmare has been honored by the Director General of Police | प्रकाश शंकरराव वाघमारे यांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर

प्रकाश शंकरराव वाघमारे यांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 27 -  पुणे ग्रामीण पोलीस दलातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश शंकरराव वाघमारे यांना सन 2016 या वर्षाचे पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे. वाघमारे यांनी पोलीस दलात 25 वर्षे सेवा केली असून, त्यांना हे सन्मान चिन्ह येत्या सोमवारी महाराष्ट्रदिनी ( 1 मे)  रोजी प्रदान केले जाणार आहे.
 
वाघमारे यांनी बारामती शहर, इंदापूर, देहूरोड, वडगाव मावळ या पोलीस ठाण्यात सेवा केली असून, ते सध्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्यांनी 25 वर्षात अनेक विशेष कामगिरी केल्याने त्यांना आता पर्यंत जिल्हा पोलीस दला अंतर्गत 199 पदके मिळालेली आहे. त्यांच्या कामगिरी बद्दल पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक  व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे. 

Web Title: Public Prosecutor Shankarrao Waghmare has been honored by the Director General of Police