शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जावयाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 08:50 IST

माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलांना एका लग्न समारंभाच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी अपमानास्पद वागणूक दिली. या नैराश्यातून जावयाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली. याप्रकरणी एका नवरदेवासह सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी : माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलांना एका लग्न समारंभाच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी अपमानास्पद वागणूक दिली. या नैराश्यातून जावयाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली. याप्रकरणी एका नवरदेवासह सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहुणा समाधान शिंदे, सचिन शिंदे, सासू दुर्गाबाई शिंदे (सर्व रा. चाकण), साडू महेश लोखंडे, साडुचा मुलगा गणेश लोखंडे (रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद मुत्तान्ना लोखंडे (वय २७, रा. वैद वस्ती, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. तर सुरेश लोखंडे असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश यांची पत्नी छाया लोखंडे या त्यांच्या तीन मुलांसह चाकण येथे माहेरी राहतात. सुरेश हे पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.

दरम्यान, रविवारी (१९ एप्रिल) सुरेश यांच्या साडुचा मुलगा गणेश याचा चाकण येथे विवाहाचा कार्यक्रम होता. या विवाह समारंभासाठी गणेश याच्या घरी सर्व पाहुणे आले होते. त्यामध्ये सुरेश यांची पत्नी आणि मुलेही आले होते. पत्नी व मुलांना भेटण्यासाठी सुरेश बुधवारी गणेश याच्या घरी गेले. पत्नी छाया हिने सुरेश यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले नाही. तसेच आरोपींनी सुरेश यांना मारहाण केली. ‘आमच्या घरी लग्न आहे’ तुमच्यामुळे लग्न कार्यात अडथळा नको. लग्नानंतर आम्ही तुम्हाला बघून घेवू’ अशी धमकी आरोपींनी सुरेश यांना दिली. त्यावेळी ‘आपण आपले भांडण घरात बसून मिटवू पाहुण्यांसमोर गोंधळ नको’ असे सुरेश यांनी सांगितले. त्यावर ‘तु तिकडे मरुन जा, आमच्या लग्नात येवू नको, आणि मुलांनाही भेटू नको’ असे आरोपी सुरेश यांना म्हणाले. या नैराश्यातून सुरेश यांनी त्यांच्या पिंपळे गुरव, वैद वस्ती येथील राहत्या घरी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास उघडकीस आली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस