शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
7
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
8
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
9
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
10
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
11
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
12
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
13
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
14
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
15
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
16
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
17
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
18
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
19
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
20
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून ६० कोटींची तरतूद : जयकुमार गोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:49 IST

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १९ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या सोहळ्याची प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आहे.

नीरा : यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत ६० कोटींची तरतूद केली आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पालखी मार्गावर ठिकठिकाणी निवारा शेड उभारल्या जातील. तसेच नीरा पालखी तळाच्या काॅंक्रिटीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी तत्काळ देत असून, तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेला दिल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १९ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या सोहळ्याची प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आहे. याची पाहणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील नीरा विसावा स्थळाला भेट दिली असता, ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरीचे सपोनि. दीपक वाकचौरे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, प्रमोद काकडे, उमेश चव्हाण, दीपक काकडे, साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखने, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, लोणंदचे सपोनि. सुशील भोसले यांच्यासह पुणे जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री गोरे पुढे म्हणाले, मागील वर्षी ज्या-ज्या अडचणी आल्या त्या अडचणींचा अभ्यास करून प्रशासनाने यावर्षीच्या पालखी सोहळ्याची सर्व तयारी केली आहे. पावसामध्ये वारकऱ्यांसाठी निवारा ठिकाणे असावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांच्या होत्या. त्यानुसार जर्मन अँगल वापरून यावर्षी आम्ही सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाची निवारा व्यवस्था निर्माण करत असल्याचेही गोरे यांनी म्हटले आहे.पालखीची खूप चांगली तयारी केली आहे. सर्व अडचणींवर मार्ग काढण्याचे काम प्रशासन व आम्ही सर्वजण करत आहोत. चालूवर्षी पाऊस खूप झाला आहे. या पावसामुळे छोटे-मोठे नुकसान झाले आहे, रस्ते खराब झाले आहेत, पालखी तळांवर पाणी साठले आहे. फलटण तालुक्यातील तरडगावचा संपूर्ण पालखी तळ पाण्यात गेला आहे. तो दुरुस्त करण्यास सांगितले आहे. त्यासाठी दीड कोटी खर्च येणार आहे. दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.पंढरपूर वाखरीमध्ये काय अडचणी होत्या, त्या सर्वांना पर्यायी व्यवस्था करायचं काम चालू आहे. पावसामध्ये वारकऱ्यांसाठी काही निवारा ठिकाणे तयार केली पाहिजेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाचे जर्मन अँगल यावर्षी आम्ही टाकत आहोत. त्यातून निवारा होईल.स्वागत कमानी व स्टेज नकोचस्वागत कमानीचा विषय नव्हता. काही ठिकाणी लोक स्वागत कमानी उभ्या करतात आणि त्याठिकाणी स्टेज घालून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. डीजे लावतात त्याचा कर्कश असा आवाज येतो. या संदर्भात आळंदी पालखी विश्वस्तांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केली आहे.सरकारचे आठ ते दहा कोटी वाचलेशौचालय टेंडर सोलापूर जिल्ह्यावरून पुणे जिल्ह्याला. त्याच्या पाठीमागे काही स्टेटस नाही. गेल्या काही वर्षांपासून हे टेंडर पुण्यात होते. आताही आम्ही पुण्यातच केलं. सोलापूरला डिव्हाईड करून काय करता येते का? याचा प्रयत्न आपण केला होता. काही गोष्टींत आपण त्या टेंडरमध्ये मोनोपोली होती त्याला छेद देत निर्णय घेतले. त्यामुळे चालूवर्षी सरकारचे आठ ते दहा कोटी रुपये वाचले. मागील वर्षी टेंडर साधारण २४-२५ कोटी रुपयांचं होतं, ते वाढवून आता २७-२८ कोटी रुपयांचं होत होतं. ते आता १५-१६ कोटींवर येईल. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड