गणेश विसर्जनानिमित्त ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST2021-09-18T04:12:21+5:302021-09-18T04:12:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जनानिमित्त येत्या रविवारी अत्यावश्यक सेवा, तसेच रेस्टॉरंट, हॉटेल वगळता अन्य सर्व दुकाने ...

Provision of 4,000 policemen for Ganesh immersion | गणेश विसर्जनानिमित्त ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेश विसर्जनानिमित्त ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गणेश विसर्जनानिमित्त येत्या रविवारी अत्यावश्यक सेवा, तसेच रेस्टॉरंट, हॉटेल वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पुणे शहरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी आहे, तर काही ठिकाणी फिरत्या हौदांची सोय असणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवणे, खेळ खेळणे, मिरवणुका काढण्यास यंदाही बंदी आहे, असे अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी विसर्जनावेळी शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे, तसेच नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. मिरवणूक सकाळी १० वाजत सुरू होईल, तर मानाच्या सर्व गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन संध्याकाळी ७ वार्जपर्यंत करण्यात येणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Provision of 4,000 policemen for Ganesh immersion