चंद्रकांत दरोडे विद्यालयाला ५० टॅब प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:55+5:302021-01-08T04:26:55+5:30

पुणे : महात्मा फुले वसतिगृह संस्थेच्या चंद्रकांत दरोडे विद्यालयाला ई-लर्निंगसाठी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून ५० टॅब प्रदान करण्याचा कार्यक्रम ...

Providing 50 tabs to Chandrakant Darode Vidyalaya | चंद्रकांत दरोडे विद्यालयाला ५० टॅब प्रदान

चंद्रकांत दरोडे विद्यालयाला ५० टॅब प्रदान

पुणे : महात्मा फुले वसतिगृह संस्थेच्या चंद्रकांत दरोडे विद्यालयाला ई-लर्निंगसाठी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून ५० टॅब प्रदान करण्याचा कार्यक्रम संस्थेच्या कै. दादासाहेब दरोडे सभागृहात पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, तर अध्यक्षस्थानी महात्मा फुले वसतिगृह संस्थेचे विश्वस्त चिटणीस अरुणभाऊ कुदळे तसेच कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे ग्रुप चेअरमन डाॅ. मुकुंदराव अभ्यंकर, माजी आमदार कमलताई ढोले-पाटील, ज्येष्ठ उद्योजक दिपक कुदळे, शाळा समिती अध्यक्ष विजय लोणकर, विश्वस्त नितीन दरोडे, विश्वस्त रमेश बोडके, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, दीपक जगताप उपस्थित होते.

दीपक कुदळे यांनी प्रास्ताविक केले. रोहिणी कांबळे आणि नीता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. महात्मा फुले वसतिगृह संस्थेचे विश्वस्त विनोद सातव यांनी आभार मानले.

Web Title: Providing 50 tabs to Chandrakant Darode Vidyalaya