शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती द्या;ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:37 IST

दोन वेळा ही मागणी नाकारली जाते व त्याचे कारणही दिले जात नाही. तुलनेत अर्थमंत्र्यांकडून महाज्योतीला दुय्यम वागणूक दिली जात आहे.

-संदीप पिंगळेपुणे : शासनाकडून बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांसाठी समान धोरण लागू करण्यात आले आहे. मात्र, त्यात कुठेच समानता दिसून येत नाही. सारथी संस्थेला निधी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होतो, परंतु महाज्योती संस्थेला अधिवेशनात पुरवणी मागणी करावी लागते. दोन वेळा ही मागणी नाकारली जाते व त्याचे कारणही दिले जात नाही. तुलनेत अर्थमंत्र्यांकडून महाज्योतीला दुय्यम वागणूक दिली जात आहे. महाज्योती संस्थेला स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यासह महाज्योतीचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावे, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषदेत केली.यासंदर्भात हाके म्हणाले, सारथी संस्थेच्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकपासून अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे. परंतु, महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दि. २५ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यानची म्हणजे ५ महिने ६ दिवसांची अधिछात्रवृत्ती देण्यात आली. सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी निधी नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच निधी मंजूर होतो व त्याचे वाटपही सुरू करण्यात आले. मात्र, महाज्योतीच्या एकाही विद्यार्थ्याला निधीअभावी अद्याप नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात आली नाही.मंगेश ससाणे म्हणाले, महाज्योती संस्थेला स्वतंत्र जागा मिळणे गरजेचे आहे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला अद्याप अध्यक्ष दिलेला नाही. शासनाने महामंडळालाही जागा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर महाज्योतीचे काही विद्यार्थी पीएच.डी. करीत असून, त्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी. पावसाळी अधिवेशनात महाज्योती संदर्भातील सर्व मागण्या मान्य कराव्यात. सारथी संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीच्या तीन पट अधिक निधी महाज्योतीला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवीत असलेल्या अजित पवार यांनी एखाद्या कारखान्याची निवडणूक लढवणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. अशा साखर कारखान्यांना निधी देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे पैसा आहे, मात्र महाज्योतीच्या पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी निधी नाही. ही महाज्योतीला देण्यात येणारी दुय्यम वागणूकच आहे.  - लक्ष्मण हाके, ओबीसी नेते

टॅग्स :Puneपुणेlaxman hakeलक्ष्मण हाकेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र