पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 08:06 PM2021-01-04T20:06:39+5:302021-01-04T20:06:58+5:30

महापालिका आयुक्तांना दिल्या प्रलंबित कामांबाबत सूचना

Provide funds for the development of newly included villages in Pune Municipal Corporation: Supriya Sule | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा : सुप्रिया सुळे

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधीची तरतूद करा : सुप्रिया सुळे

Next

पुणे : पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करुन प्राधान्यक्रमाने ड्रेनेज, रस्ते, पाणी पुरवठा, वीज आदी कामांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी. यापूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांतील शाळा, अंगणवाड्या पालिका प्रशासनाशी जोडून घ्याव्यात तसेच वर्ग करून घेतलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे पगार नियमित करावेत, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे पत्र दिले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, नगरसेवक सचिन दोडके, गणेश ढोरे, वंदना धुमाळ, भरत झांबरे उपस्थित होते. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून ग्रामपंचायत आणि पालिकेकडून गोळा केल्या जाणाऱ्या करामध्ये तफावत आहे. पालिकेचा कर जास्त असूनही पायाभूत सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. पालिकेची कर आकारणी ग्रामपंचायत कराच्या दीड पटीपेक्षा अधिक नसावी.

यापुर्वी समावेश झालेल्या ११ गावांमधील शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, त्यांच्या अस्थापना अजूनही जिल्हा परिषदेकडेच आहेत. त्या पालिकेकडे वर्ग कराव्यात. तसेच पालिकेत वर्ग झालेल्या ग्रामपंचायत कर्मचा-यांना पालिकेच्या आरोग्य आदी सेवा दिल्या जाव्यात. या गावांमधील निधी अभावी थांबलेली कामे आगामी अंदाजपत्रकात तरतूद करुन कामे पुर्ण करावीत. करारपद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन नाही. त्यावर कार्यवाही करावी अशा सूचना सुळे यांनी केल्या.
====

 मुंबई-बेंगलुरु महामार्गावरील नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केल्या. यासंबंधी  सुळे आणि चाकणकर यांना सजग महिला मंच, अनिता मुनोत मैत्री ग्रुप, सन्मती महिला मंडळ, न-हे शक्ती ग्रुप, तसेच न-हे गावातील विविध सोसायट्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Web Title: Provide funds for the development of newly included villages in Pune Municipal Corporation: Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.