शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! अमेरिकेच्या निवडणुकीत पुण्याच्या वैदेहीची चित्रे;‘थिंक वुमन’ मोहिमेचे प्रतीक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 05:05 IST

या चित्रकार युवती आहे वैदही रेड्डी. अमेरिकेतील मेरिलॅन्ड राज्यात ‘थिंक वूमन’ या संस्थेने पुण्यातील वैदेहीच्या चित्रकृतीला मोहिमेत मानाचे स्थान दिले.

पुणे : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक विविध कारणांनी चर्चेचा ठरली, हे सर्वश्रूत आहेच. पण या निवडणुकीतली उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘थिंकवूमन’ या राबविण्यात आलेल्या मोहिमेचे प्रमुख प्रतीक (सिम्बॉल) म्हणून पुण्यातील एका  चित्रकार युवतीच्या चित्रकृतीचा वापर करण्यात आला. ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. 

या चित्रकार युवती आहे वैदही रेड्डी. अमेरिकेतील मेरिलॅन्ड राज्यात ‘थिंक वूमन’ या संस्थेने पुण्यातील वैदेहीच्या चित्रकृतीला मोहिमेत मानाचे स्थान दिले. वैदेहीने आपले शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये पूर्ण केले असून तिचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत. अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नल विद्यापीठाची सुमारे २ कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही वैदेहीने मिळवली आहे.  वैदेहीच्या या चित्रकृतीमध्ये सध्याच्या पिढीचे स्त्री चित्रण आहे. शिवाय ही कलाकृती या शतकातील स्त्रीच्या प्रेरणा, विचार व स्वप्न दर्शवते म्हणूनच या चित्रकृतीची निवड ‘थिंक वूमन’ या संस्थेने केली होती. वैदेहीने या चित्राची निर्मिती सन २०१८ मध्ये केली होती. ही चित्रकृती  अबस्ट्रॅक्ट कंटेम्पररी स्टाईल प्रकारातील आहे. वैदेहीला यापूर्वी अनेक सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी तिने २०१४ साली राष्ट्रीय स्तरावरील ‘गुगल डूडल’ स्पर्धा जिंकली होती. 

थिंक वूमन संस्थेने माझे कार्य ऑनलाइन पाहिले आणि माझ्या चित्रकृतीची निवड केली. निवडणुकीच्या प्रक्रियेत महिला जागरूकता आणि महिला मतदारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांविषयीच्या विधायक कार्यासाठी याचा वापर करण्यात आला हे माझ्यासाठी सन्माननीय आहे. ही चित्रकृती एकविसाव्या शतकातील स्त्रीची स्वतंत्र विचारसरणी, प्रेरणा आणि स्वप्ने दाखवते. - वैदेही रेड्डी, चित्रकार 

टॅग्स :AmericaअमेरिकाElectionनिवडणूक