शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अभिमानास्पद ! हिंदू व बाैद्ध समाजाने मशीद बांधण्यासाठी घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 19:42 IST

काेरेगाव भीमा येथील मशीद बांधण्यासाठी येथील हिंदू आणि बाैद्ध बांधवांनी पुढाकार घेत लाेकवर्गणी जमा केली.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील जामा मशीद बांधणीसाठी हिंदू व बौद्ध समाजाने लोकवर्गणीद्वारे पुढाकार घेतला. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी टाकलेल्या या पावलामुळे ग्रामस्थांची सामाजिक वीण अधिक घट्ट होण्यास मदत होत आहे.

कोरेगाव भीमा परिसरामध्ये गेल्या दाेन - तीन वर्षांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमाच्या नावलौकिकात डाग लागलेला असल्याने सामाजिक तणाव निर्माण झाला होता. मात्र या अप्रिय घटनांतून प्रत्येक वेळी सामाजिक ऐक्य अबाधित राहण्यासाठी पुढाकार घेत असतानाच गेल्या काही वर्षांपासून कोरेगाव भीमात महापुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सण, उत्सव यांसह विविध उपक्रमांद्वारे सर्वधर्मसमभावाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करून सर्व समाजाला एकत्र करीत सामाजिक वीण पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न केला. यात आज एक पाऊल पुढे टाकीत कोरेगाव भीमा मशीद वाढीव इमारत बांधकामातही आज सामाजिक ऐक्य सर्व समाजाने दाखवून देत सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले.

यावेळी विठ्ठलराव ढेरंगे, पी. के. गव्हाणे, नारायणराव फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक गव्हाणे, विक्रमराव गव्हाणे, कैलासराव सोनवणे, अनिल काशीद, बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, संजय काशीद, अशोक काशीद, संदीप ढेरंगे, महेश ढेरंगे,  केशव फडतरे, विक्रम दौंडकर, बबनराव गव्हाणे, पोपट ढेरंगे, दत्तात्रय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, कांतीलाल फडतरे, नीलेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, आशा काशीद, मालन साळुंके, विलास खैरमोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोरेगाव भीमातील सर्व प्रमुखांनी मशीद बांधकामासाठी देणगी देत यापुढेही गावातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करतानाच तरुणांनीही सामाजिक भान जपण्यासाठी ज्येष्ठांनी मार्गदर्शक बनण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारHinduहिंदूMuslimमुस्लीमPuneपुणे