शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएचएम’ च्या कर्मचा-यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: November 20, 2023 17:07 IST

विविध मागणीसाठी बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात आंदोलन केली परंतु सरकारने आज पर्यंत फक्त आश्वासनच दिली, असे संघटनेचे म्हणणे

पुणे : एनएचएम कर्मचारी व अधिकारी यांचे गेले २३ दिवस राज्यभर विविध मागण्या करता बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा विचार केला नाही. त्याचा निषेध करत शासनाला जाग यावी म्हणून साेमवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पर्यंत भव्य मोर्चा कृती समितीने काढला. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदाेलन केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2005 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले व आरोग्य सेवा देण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान चा वाटा महाराष्ट्रात खूप मोठा आहे. परंतु सेवा देणारे कर्मचारी यांच्या हाती मात्र शासनाकडून नारळच आज पर्यंत देण्यात आला. विविध मागणीसाठी बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात आंदोलन केली परंतु सरकारने आज पर्यंत फक्त आश्वासनच दिली, असे संघटनेने म्हटले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या 

- गेली अठरा वर्ष झाली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहे. सदर सर्व कर्मचारी यांचे 100% शासन सेवेत समावेशन केले पाहिजे.- 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी अधिकारी आरोग्य विभागात आपातकालीन सेवा देत आहे. सुरुवातीला सहा ते आठ हजार या तुटपूंज्या मानधनावर काम सूरू करून सद्यस्थितीत त्यांना 17 हजार ते 18 हजार एवढ्या तुटपुंज्या पगारावर कामे करीत आहेत.- शासनाने २०१८ मध्ये रॅशनलायझेशन करून अठरा ते वीस हजार पगार केले परंतु या रॅशनलायझेशनमुळे ज्या कर्मचाऱ्यांना १० वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना कुठलीही पगारवाढ नाही. तरी सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने ५० टक्के पगार वाढ देण्यात यावी.- 3 टक्के वेतनवाढ 2014 पासून तात्काळ लागू करावी. आरोग्य विभागात नियमित पदावर जे कर्मचारी सेवा देत आहेत त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारीही सेवा देत आहे. पण सारखीच सेवा दिल्यावर वेतनातील तफावत तात्काळ दूर करण्यात यावी.- ओरिसा, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब अशा राज्यात एनएचएम कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे ग्रेड पे लागु करा

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलनEmployeeकर्मचारी