शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील संघर्षाचा निषेध : हडपसर, मांजरीत बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 03:17 IST

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

हडपसर - कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला हडपसर, फुरसुंगी, ससाणेनगर, माळवाडी परिसरात प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला.सकाळी दहापर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते; मात्र साडेदहानंतर बंदला पाठिंबा दिला. पोलीस बंदोबस्त कडक असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विविध संघटनांनी रॅली काढून हडपसर पोलीस ठाण्यामध्ये वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांना निवेदन दिले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) आणि (आंबेडकर गट), जनता दल, संभाजी ब्रिगेड, बहुजन पार्टी (मायावती) आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून हडपसर पोलीस ठाण्यात नेला. या प्रसंगी रिपाइं (आठवले गट) पुणे शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात, महादेव कांबळे, बाळ कांबळे, सागर खाडे, विठ्ठल सातव, विक्रम आल्हाट, गौतम शिंदे, नरेंद्र बनसोडे, प्रीतम धिवार, राजू कांबळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.भिडे, एकबोटे यांना अटक करण्याची मागणीनिवेदनात म्हटले आहे, की कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता.त्या वेळी हल्ल्यात एका तरुणाचा नाहक बळी गेला. त्याच्या निषेधार्थ हडपसरमधील पुरोगामी, आंबेडकरवादी संघटनांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर महाराष्ट्र बंद ठेवल्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी लाखो पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. हाच बंदोबस्त कोरेगाव भीमा येथे अगोदर ठेवला असता, तर दुर्दैवी घटना घडली नसती आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता.- शशिकला वाघमारे,अध्यक्षा- रिपाइं आठवले गटहडपसरमधील भीमसैनिकांनी शांततेत मोर्चा काढला आहे. कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. तुमच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचविल्या जातील. नागरिकांना त्रास होईल, असे वागू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान आणि घटनेनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- मिलिंद पाटील,सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग)भीमसैनिकांचे शिवरायांना अभिवादनमांजरी : मांजरी खुर्द येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भीमसैनिकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जय भीम’ अशा घोषणा देऊन वातावरण शांत करण्यात आले. तसेच, कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी, निंदनीय असून त्याचा शांतपणे निषेध व्यक्त केला व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद