देशात व राज्यात कोरोना महामारीची लाट असून जनता कोरोनाचा सामना करीत आहे. वैद्यकीय उपचार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेची फरफट होत आहे. पॅट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर याची दरवाढ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जनता हतबल झाली, तरी केंद्र सरकारने दरवाढ कमी करून सामान्य जनतेला परवडेल असे दर करावेत. अन्यथा, खेड तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. या वेळी खेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे सभापती
विनायक घुमटकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे,ॲड अरुण मुळूक, मयूर मोहिते पाटील, सुभाष होले, संध्याताई जाधव ,कांचन ढमाले ,मनीषा सांडभोर , मनीषा टाकळकर ,आशा तांबे , उमेश गाडे , वैभव नाईकरे ,किरण पवार व पदाधिकारी उपस्थित होते .
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाई विरोधात निषेध मोर्चा काढला होता.