शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी केले रास्ता राेकाे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:14 IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रविवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रविवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. 

    पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, जगन्नाथ गायकवाड, रोहिदास गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, किरण भालेराव यांच्यासह सर्व मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंबरनाथ येथे आठवले यांच्या बाबतीत घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे मत व्यक्त करत या घटनेचा पक्षाच्या वतीने यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.  

     डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, रामदास आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते असून वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे.  संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच आठवले यांना पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत अधिक वाढ करावी.आठवले यांच्या वरील हल्ल्याचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करावा.बाळासाहेब जानराव म्हणाले, रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आसुया आहे. याच राजकीय भावनेतून हा हल्ला झाला असावा.मात्र,विचारांचा सामना अशा पद्धतीने करणा-या प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे.      परशुराम वाडेकर म्हणाले, रामदास आठवले  दलित, शोषित, आदिवासी जनतेच्या प्रश्नांवर लढणारे नेते असून त्यांच्यावर झालेला हल्ला हा प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने झाला आहे. त्यांना झेड सुरक्षा असताना स्थानिक पोलीस काय करत होते, याची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी. या प्रसंगी महेश शिंदे, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, अशोक कांबळे, रोहिदास गायकवाड, शैलेंश चव्हाण, जगन्नाथ गायकवाड, महिपाल वाघमारे यांनीही रामदास आठवले यांच्या वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलन समाप्त झाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेPoliceपोलिस