पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:29+5:302021-05-14T04:10:29+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शांततामय वातावरणात निषेध व्यक्त पुणे : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात ...

पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध,
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शांततामय वातावरणात निषेध व्यक्त
पुणे : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात झाली. यामध्ये हिंदू कार्यकर्त्यांना व त्यांच्या घरांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले. कित्येक निरपराध कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली. याचा निषेध विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने केला. या वेळी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.
शुक्रवार पेठेतील भारत भवनच्या आवारात शांततामय वातावरणात हा निषेध व्यक्त केला. या वेळी परिषदेचे संजय मुद्राळे, पुणे विभाग मंत्री तुषार कुलकर्णी, आशिष काटे, नाना क्षीरसागर, प्रतीक गोरे, अनंत शिंदे, राजेश जाधव, गजानन वाघ, निखिल कुलकर्णी, श्रीराम पारखी, कृष्णकांत चांडक उपस्थित होते.
तुषार कुलकर्णी म्हणाले की, निकोप निवडणुका हाच लोकशाहीचा गाभा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, लोकशाहीचा कोणताच विधिनिषेध पाळला गेला नाही. हिंदू कार्यकर्त्यांना व त्यांच्या घरांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले. कित्येक निरपराध कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली. महिलांवरही अमानुष अत्याचार झाले. हिंदू कुटुंबांची घरे लुटली त्यांना बेघर केले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की, अशी देशविघातक कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत.