निसर्गाचे रक्षण करणे काळाची गरज : अतुल सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST2021-06-06T04:08:16+5:302021-06-06T04:08:16+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील लालपुरी व जानकर मळा येथील परिसरात जागतिक पर्यावरण दिन व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ...

निसर्गाचे रक्षण करणे काळाची गरज : अतुल सावंत
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील लालपुरी व जानकर मळा येथील परिसरात जागतिक पर्यावरण दिन व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजमाता अाहिल्यादेवी प्रतिष्ठान कळंब वालचंदनगर यांच्या वतीने ५३ झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन व वाढदिवस साजरा करण्यात आला याठिकाणी पिंपळ, चिंच, बोर, सीताफळ, आंबा, शिसम, वड आदींचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कळंब ग्रामपंचायत येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल सावंत कळंब ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर मेटकरी, ग्रा. सदस्य कळंब संदीप पाटील अप्पासाहेब जानकर, महेश धायगुडे, नितीन जानकर, रोहन पांढरमिसे, राहुल अर्जुन, अविनाश पांढरमिसे, हनुमंत पवार, अमित घोडके, रोहित जानकर, विनायक कचरे, संदीप जानकर, संतोष जावीर, तेजस जानकर उपस्थित होते.