शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Shivaji Maharaj: वनस्पतींना संरक्षण द्या! महाराजांची भावना; विशाळगडावर आढळलेल्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव

By श्रीकिशन काळे | Updated: August 6, 2024 15:21 IST

वनस्पतींना संरक्षण द्यावे, गडांची राखण करावी, निसर्ग जपावा अशीच भावना शिवरायांची असल्याने या नव्या वनस्पतीला शिवाजी महाराजांचे नाव दिले

पुणे: विशाळगडावर आणि सह्याद्रीमध्ये आढळून येणारी अतिशय सुंदर अशा कंदीलपुष्प या वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला असून, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीचे नामकरण 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे केले आहे. ही वनस्पती वेलवर्गीय आहे, तर त्याचे चार वेल संशोधकांना विशालगडावर दिसून आले. 

आपल्या महाराष्ट्रामध्ये कंदीलपुष्पाच्या २६ प्रजाती पहायला मिळतात. त्यातील १७ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. महाराष्ट्रामध्ये ‘सेरोपेजिया’ या वनस्पतीच्या प्रदेशनिष्ठच्या प्रजाती सर्वाधिक आहेत. यामधील बहुतेक जाती दुर्मीळ आहेत. आता विकासकामांमुळे काही प्रजाती धोक्यात येत आहेत.

'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर'ने (आययूसीएन) कंदीलपुष्पाच्या काही प्रजातींना 'संकटग्रस्त' म्हणून रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. ही परिस्थिती असताना वनस्पती संशोधकांना विशाळगडावर कंदीलपुष्पची नवी प्रजाती आढळून आली आहे. या वनस्पतीचा शोध वनस्पतिशास्त्रज्ञ अक्षय जंगम, डाॅ. शरद कांबळे, डाॅ. श्रीरंग यादव, रतन मोरे, डाॅ. निलेश पवार यांनी लावला आहे. याविषयीचे संशोधन मंगळवारी (दि.६) 'फायटोटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले. 

 गेल्या काही वर्षांपासून अक्षय जंगम आणि डॉ. नीलेश पवार कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करताहेत. त्याअंतर्गत त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती दिसली.  त्यांना ही प्रजाती 'सेरोपेजिया सांतापावी' आणि 'सेरोपेजिया करुळेएन्सिस' या दोन प्रजातींशी साधर्म्य असणारी वाटली. या प्रजातीची तुलना 'सेरोपेजिया लावी' या प्रजातीशी केली. 'सेरोपेजिया लावी' ही झुडूपवर्गीय वनस्पती असून 'सेरोपेजिया शिवरायीयाना' ही वेलवर्गीय आहे. ही प्रजाती केवळ विशाळगडावरच दिसली आहे. नव्या प्रजातीला महाराजांचे नाव का दिले, तर शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवली. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांनी या वनस्पतींना संरक्षणच दिले होते. गडांची राखण करावी, निसर्ग जपावा अशीच भावना शिवरायांची होती. त्यामुळे त्यांची निसर्ग संवर्धनाची भावना लक्षात घेऊन या वनस्पतीला त्यांचे नाव दिले.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिकFlowerफुलंFortगडenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग