शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आंबेगावातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; युपीतील तरुणींना दाखवले होते नोकरीचे अमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:24 IST

ब्रम्हा पॅलेस लॉजवर छापा घालून दोन तरुणींची सुटका...

पुणे : उत्तर प्रदेशातील तरुणींना नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे - मुंबई रोडवरील आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजवर छापा घालून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

विपुल बाबासाहेब बेलदरे (वय ३६, रा. भैरबा मंदिराशेजारी, आंबेगाव) आणि विक्रम करण शोनार (वय २४, रा. ब्रम्हा लॉज, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजयप्रसाद महतो, केदार मंडल व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल हा हॉटेल मालक तर विक्रम हा व्यवस्थापक आहे. आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. विपुल बेलदरे व विक्रम शोनार हे २० व २१ वर्षांच्या उत्तर प्रदेशातील तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते.

या तरुणींना हिंजवडी येथील कम्पर्ट ईन या हॉटेलमध्ये ठेवण्यात येऊन त्यांच्याकडून येथे वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या तरुणींना उत्तर प्रदेशातून काम देण्याच्या आमिषाने पुण्यात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर, कर्मचारी प्रमोद मोहिते, अण्णा माने, इरफान पठाण, पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग