शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | जेजुरी-सासवड रोडवरील लॉजवर वेश्या व्यवसाय; दोन मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:02 IST

बेलसर येथे दोन मुलींची सुटका...

जेजुरी (पुणे) :जेजुरी-सासवड रोड वरील बेलसर गावचे हद्दीतील वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉजवर जेजुरी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवीत छापा टाकून कारवाई केली. यात वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगाल मधून आणलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली.

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेजुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जेजुरी सासवड मार्गालगत असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवले. बनावट ग्राहकाने खात्री करून पोलिसांना इशारा केला असता पोलिसांनी छापा टाकला. यात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या पश्चिम बंगाल मधून आणलेल्या दोन मुली आढळून आल्या.

जेजुरी पोलिसांनी लॉज व्यवस्थापक रामा नारायण मोगाविरा ( वय ३८,रा. हॉटेल जय भवानी,सासवड रोड,वडकी,ता. हवेली) यास ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका करण्यात आली आहे. जेजुरी पोलिसांनी आरोपी लॉज व्यवस्थापकास अटक करून त्याच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,(१),५,७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर,पोलिस हवालदार नंदकुमार पिंगळे, पोलिस हवालदार एन.आर.दोरके,पोलिस नाईक गणेश नांदे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगProstitutionवेश्याव्यवसायJejuriजेजुरी