शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसाय करणा-या देवदासी येणार ऑन रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 11:18 IST

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत असेल तर तिची ओळख देखील यातून स्पष्ट होईल.

ठळक मुद्देबुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची होणार नोंदणी  गैरप्रकार थांबविण्यासाठी फरासखाना पोलिसांची मोहिम गुन्हेगारी प्रवृत्ती, व्यसनी व्यक्ती रात्रीच्या वेळी याठिकाणी येवून धिंगाणा घालत असल्याचे प्रकार

सनील गाडेकर  पुणे : बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणा-या प्रत्येक महिलेची पोलिसांकडे माहिती असावी, तसेच येथील गुन्हेगारी कमी होवून अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो का? याची चाचपणी करण्यासाठी पेठेतील सर्व देवदासांची वैयक्तिक माहिती व कागदपत्रे घेवून त्यांची नोंद ठेवली जाणार आहे.  परिसरातील गुन्हेगारांचा वावर रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिसांच्यावतीने विशेष मोहिम हातीत घेण्यात आली. अल्पवयीन मुलींकडून करून घेण्यात येणारा वेश्याव्यवसाय थांबवणे आणि येथील बेकायदेशीर व्यवसांना आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आत्तापर्यंत सुमारे २ हजार देवदासींची नोंदणी करण्यात आली आहे. या कामासाठी दोन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून त्या प्रत्येक इमारतीमध्ये जावून तेथे राहत असलेल्या महिलांचे ओळखपत्र, फोटो, पत्ता आणि मोबाइल नंबर अशी माहिती नोंदवत आहे. तर काहींना पोलीस चौकीत येवून स्वत:ची माहिती दिली आहे. या नोंदणीमुळे या ठिकाणी नेमक्या किती महिला वास्तव्यास आहे, याची माहिती मिळेल. तसेच अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत असेल तरी ओळख देखील यातून स्पष्ट होईल. एखाद्या मुलीच्या बाबतीत काही गैरप्रकार झाला तर त्याच्या विषयी लवकर माहिती मिळत नाही. अशा वेळी तिची ओळख पटविणे अवघट असते. यामुळे त्यांची माहिती ठेवण्यात येत आहे. त्यातून त्यांच्यात देखील सुरक्षेची भावना निर्माण होईल, अशी माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली.  गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि व्यसनी व्यक्ती रात्रीच्या वेळी याठिकाणी येवून धिंगाणा लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी १ जानेवारीपासून रात्री ११ नंतर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यातून येथील गैरप्रकार काहीसे कमी झाले असून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी झाला आहे. ......................गुन्हेगारांचा असतो वावर बुधवार पेठेत सुमारे ४०० कुंटणखाणे आहेत, यामध्ये सुमारत पाच ते सहा हजार महिला वेश्याव्यवसाय करतात. परिसरात गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अनेकदा काही गुन्हेगार गुन्हा केल्यावर येथे लपून बसतात. तर वेश्याव्यवसाय व पैशाच्या देवाण घेवाणीतून येथे वाद होत असताना. नागरिकांना लूबाडण्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येतात. या पार्श्वभूमीवर हा ड्राईव्ह घेण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली.  ............................परदेशी महिलांच्या घुसखोरीला लगाम : वेश्या व्यावसाय करण्यास परदेशी महिलांना देखील या परिसरात आणले जाते. त्याच्यासाठी खास व्यवस्था देखील केली जात होती. मात्र सर्वांची नोंदणी ठेवल्यामुळे या महिलांच्या घुसखोरीला लगाम लागणार आहे. नाकाबंदीमुळे येथील काही गैरप्रकारांना आळा देखील बसला आहे. 

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी