शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

भोर पंचायत समितीकडे ४ गावांचे टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर २ टँकर मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:57 IST

भोर : पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे ४ ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. ...

भोर : पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे ४ ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पैकी २ गावांचे टँकर मंजूर झाले असून लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा सुरू झाला असून जसजसे उन्हाचा तडाखा वाढतोय तसतसी टंचाई वाढत चालली आहे.

निरादेवर धरणात २४ टक्के तर भाटघर धरणात २९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला असून दोन्ही धरणाच्या पात्रात असलेल्या विहिरी कोरड्या पडत आहेत. यामुळे धरण भागातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. जसजसा उन्हाळा वाढतोय तसतशी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून टँकर मागणी वाढत चालली आहे. भोर तालुक्यात साळवडे, करंदी खे.बा, वारवंड, जयतपाडची हुंबे वस्ती, शिळिंब या चार गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.या गावांनी टंँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. साळवडे व करंदी खे. बा. या दोन गावांचे प्रस्ताव मंजूर झाले असून मे अजित पवार वाहतुक संस्थेकडे टँकर सुरू करण्यासाठी पाठवले आहेत, तर वारवंड आणि जयतपाडची हुंबेवस्ती या गावांची टंचाईची पाहणी करण्यात आली असून भोर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सदरचे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवले आहेत. मंजुरी मिळाल्यावर सदर गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. 

भोर पंचायत समितीकडे चार गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव आले असून दोन गावांचे टँकर मंजूर झाले आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल उर्वरित गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. लवकरच त्यांना मंजुरी मिळेल. - किरणकुमार धनवाडे, गटविकास अधिकारी, भोर  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीकपातwater pollutionजल प्रदूषणbhor-acभोरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड