मेट्रोच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेचा प्रस्ताव पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:30+5:302021-06-22T04:09:30+5:30

पुणे : स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गाने नेण्यात येणाऱ्या मेट्रोच्या मान्यतेचा प्रस्ताव, आजच्या सर्वसाधारण सभेत मान्य न होता तो ...

The proposal to approve the increased cost of the metro continues | मेट्रोच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेचा प्रस्ताव पुढे

मेट्रोच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेचा प्रस्ताव पुढे

Next

पुणे : स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गाने नेण्यात येणाऱ्या मेट्रोच्या मान्यतेचा प्रस्ताव, आजच्या सर्वसाधारण सभेत मान्य न होता तो आठ दिवसाने पुढे घेण्यात आला.

मेट्रोबाबत कुठल्याही मान्यतेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणताना, मेट्रोचे अधिकारी सभागृहात आले पाहिजेत, अशी मागणी पहिल्यापासूनच सदस्यांनी केली होती. तरीही आज स्वारगेट ते काजत्र मेट्रोच्या वाढीच खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव पटलावर मांडण्यात आला. मात्र याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सभासदांनी विरोध केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती नको, मेट्रोचे अधिकारी सभागृहात का बोलविले नाही. असा मुद्दा उपस्थित करीत, प्रथम या भुयारी मार्गाची आम्हाला माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी लावून धरली. अखेरीस सदर प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून अर्ध्या तासाहून अधिक प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी भाजपला हा प्रस्ताव आठ दिवस पुढे घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

-------------------------

Web Title: The proposal to approve the increased cost of the metro continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.