रेल्वे दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध
By Admin | Updated: June 29, 2014 22:58 IST2014-06-29T22:58:50+5:302014-06-29T22:58:50+5:30
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे दरवाढीविरोधात खडकवासला युवक कॉँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. सरकारने प्रवासी भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

रेल्वे दरवाढीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध
>पुणो : केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे दरवाढीविरोधात खडकवासला युवक कॉँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. सरकारने प्रवासी भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
केंद्रात सत्ता परिवर्तनानंतर चांगले दिवस येतील, अशी स्वप्ने जनसामान्यांनी पाहिली होती. ती स्वप्ने आता स्वप्नेच राहणार काय, अशी शंका नागरिकांना वाटत आहे. खडकवासला युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी या भाववाढीच्या निषेधार्थ आंदोलनाचे नियोजन केले होते. धायरी-न:हे रस्त्यावर ‘रेल्वे भाववाढ त्वरित मागे घ्या’ असे फलक हाती घेऊन घोषणा देण्यात आल्या.
सागर कोल्हे, आदित्य हवालदार, मंदर बारंगळे, उपसरपंच विकास कामठे, विकास रायकर, बलभीम कुरुंद, दिलीप माने, आरिफ तांबवे, विकास कोल्हे, अनिल वाव्हळ, आदेश रणपिसे, भरत पायगुडे, अनिकेत भोसले, मंगेश सांबरेकर, राजेंद्र कोल्हे, गणोश खंडागळे, प्रतिक कदम, आदेश बानेकर, अक्षय साळुंखे, अजरुन यादव, सुमिर यादव, योगेश यादव, भोला गुरू, कृष्णा यादव आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)