शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भारत बायोटेकच्या लशींचे पुण्यातील उत्पादन लवकरच सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:52 IST

पुणे जिल्ह्यात ‘कोव्हॅक्सिन’ लशींच्या उत्पादन अखेर लवकरच सुरू होणार आहे....

पुणे : पुण्यासह देशाचे लक्ष लागलेल्या मांजरी येथे कोरोना प्रतिबंधक लशींच्या उत्पादनासाठी ‘भारत बायोटेक’ या कंपनीकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या ‘कोव्हॅक्सिन’ लशींच्या उत्पादन अखेर लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी बुधवार (दि.2) रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी कंपनीच्या वतीने लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ( डीसीजीआय) अंतिम लायन्ससाठी अर्ज केला. ही परवानगी मिळाल्यानंतर त्वरीत उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून,  लसीकरण झालेल्या देशांमध्ये रुग्ण संख्या अधिक असून देखील गंभीर रुग्ण व मृत्यूदर खूपच कमी आहे. यामुळेच पुन्हा एकदा कोरोना लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. भविष्यातील लसीची मागणी वाढू शकते हे लक्षात घेऊन भारत बायोटेकच्या लसीचे उत्पादन सुरू होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी व संबंधित सर्व अधिकारी यांनी माजरी येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत लागणाऱ्या हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अत्यावश्यक परवानग्या दिल्या आहेत. प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाले असून,  ड्राय रन देखील घेण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले की,  या कंपनीशी चर्चा करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. कंपनीसाठी अत्यावश्यक असलेले परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी डीसीजीआयची परवानगी मिळाल्यानंतर त्वरीत उत्पादन सुरू होईल. कोरोना लशींच्या निर्मिती संदर्भात  भारत बायोटेक कंपनीच्या अधिका-यांशी नियमित संपर्क ठेवून आहे. सध्या सर्व प्रक्रीया पूर्ण झाली असून,  अंतिम लायन्स मिळाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन  लवकरच सुरू होणार असल्याचे कंपनीकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले आहे. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र