शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

पावणेपाच लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 01:52 IST

यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, राज्यातील १९४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यातील ३२ कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत.

पुणे : यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, राज्यातील १९४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यातील ३२ कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. बुधवार अखेरीस (दि. ३१) ४.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.राज्य सरकारने २० आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार साखर आयुक्तालयाकडे १०० सहकारी आणि ९४ खासगी कारखान्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. या वर्षीच्या (२०१८-१९) हंगामातही ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन १०६ ते १०७ लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा उसाचे प्रमाण ६० टक्के असल्याने सरारी ९० टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच यंदाच्या हंगामात ११.६२ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण २.६० लाख हेक्टरने अधिक आहे. १०६ ते १०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. यंदाच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने आठशे ते साडेआठशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. त्यातून ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.एफआरपी थकविलेल्या कारखान्यांचा परवाना रोखलाउसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) थकविलेल्या २९ कारखान्यांचा परवाना रोखला असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या आठ वर्षांपासूनची तब्बल ४५४ कोटी ८५ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम थकीत आहे. यातील २२१ कोटी ५९ लाख रुपयांची थकबाकी गेल्या वर्षीच्या हंगामातील आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने