शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:57 IST

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात

पुणे : आज लाखात नव्हे तर कोटींमध्ये चित्रपट निघतात. मात्र, 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे ही निर्मात्यांसाठी कठीण गोष्ट आहे. हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात. जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागे निर्माते उभे राहतात, ही आजची शोकांतिका आहे. आज कलेला ध्येयवादाकडून कुठे घेऊन चाललो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. रामदास फुटाणे यांच्यासारखा एकच माणूस आहे, ज्याने ध्येयवादाचे उद्दिष्ट ठेवून चित्रपटाची निर्मिती केली आहे, असेही कौतुकोद्गार त्यांनी काढले.

राजकारण आणि समाजकारण याचा वास्तववादी चेहरा समोर आणणारा 'सामना' चित्रपट मैलाचा दगड ठरला. सत्तरीच्या दशकातील ‘सामना’ची पन्नाशी. चित्रपटाचे निर्माता, कलाकार यांना प्रत्यक्ष मुलाखतीतून अनुभवण्याची संधी अन् चित्रपटाचे प्रक्षेपण.. असा तिहेरी योग जुळून आल्याने रसिकांची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात तुडुंब गर्दी झाली होती. सभागृहात पाय ठेवायला देखील जागा नव्हती. सभागृहात बसण्यास जागा न मिळाल्याने रसिकांनी जमिनीवर बसून सामना पाहण्याचा आनंद लुटला. एखाद्या सत्तरीच्या दशकातील चित्रपटाला एकविसाव्या शतकातही गर्दी होणे यातून या चित्रपटाचे गारुड रसिक मनावर आजही कायम असल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सामनाचे निर्माते व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विलास रकटे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार, साहित्य कला गौरवचे गौरव फुटाणे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ ‘वाळवी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटासाठी निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ‘कोहिनूर कट्टा’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे, परेश मोकाशी सहभागी झाले होते. या चर्चेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले.

मला राजकारणाचे कोणतेही आकलन नसताना हा चित्रपट काढला होता. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी आत्ता लोक या चित्रपटाला दाद देत आहेत. त्यामुळे 'सामना'चे यश हे तेंडुलकरांचे यश आहे. तेंडुलकर कळणे महत्त्वाचे आहे. ज्यांना तेंडुलकर कळले त्यांनाच चित्रपट काढणे शक्य आहे. आजच्या काळातही मारुती कांबळे लागू होतो. एससी आणि ओबीसी यांना कसे वापरायचे हे राजकारण्यांना कळते. - रामदास फुटाणे

ज्या चित्रपटाचा कंटेंट उत्कृष्ट असतो तो चित्रपट कधीच कालबाह्य होत नाही. तो आजही लागू पडतो.. हा विजय तेंडुलकर याचा चित्रपट आहे. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांचा अभिनय हेच या चित्रपटाचे व्हिज्युअल आहे. - डॉ. मोहन आगाशे

आज ' सामना' चित्रपटासारखीच एवढी गर्दी मराठी चित्रपटांना झाली पाहिजे, त्यासाठी सामनासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. एका निर्मात्याकडून जेव्हा शाबासकीची थाप मिळते तेव्हा चित्रपट करण्याची उभारी मिळते. - मधुगंधा कुलकर्णी

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाartकलाTheatreनाटकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMONEYपैसाPoliticsराजकारण