मंचरच्या ग्रामदैवताची यात्रा साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST2021-05-05T04:18:21+5:302021-05-05T04:18:21+5:30

मंचर शहराचे कुलदैवत श्रीभैरवनाथ महाराज यात्रा उत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ...

The procession of the village deity of Manchar is simply celebrated | मंचरच्या ग्रामदैवताची यात्रा साधेपणाने साजरी

मंचरच्या ग्रामदैवताची यात्रा साधेपणाने साजरी

मंचर शहराचे कुलदैवत श्रीभैरवनाथ महाराज यात्रा उत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी व यावर्षी यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. यावर्षी यात्रा कमिटीच्या झालेल्या बैठकीत नागरिकांनी घरूनच कुलदैवताचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. आज यात्रा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. संतोष काका त्रिवेदी यांच्या हस्ते सकाळी अभिषेक संपन्न झाला. उपसरपंच युवराज बाणखेले व प्रतीक थोरात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष प्रवीण मोरडे, जे.के.थोरात, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, कैलास गांजाळे, पंडित माशेरे, अशोक गांजाळे, वसंतराव बाणखेले, लक्ष्मण थोरात,दत्ताशेठ थोरात, सुरेश निघोट, जगदीश घिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

--

फोटो क्रमांक : ०४ कोरोना कुलदैवत भैरवनाथ यात्रा

फोटोखाली: कुलदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती.

Web Title: The procession of the village deity of Manchar is simply celebrated