शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा जाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 12:34 IST

तिकीटदर कमी असूनही लाखो प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून दरवर्षी त्यामध्ये वाढच होत चालली आहे..

ठळक मुद्देदरवर्षी वाढतेय प्रमाण : रेल्वेकडून विशेष पथकांमार्फत तपासणी यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतच सुमारे ७१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडले

पुणे : अत्यंत कमी दरात प्रवाशांना सेवा देणाऱ्या रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा जाच होत आहे. तिकीटदर कमी असूनही लाखो प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून दरवर्षी त्यामध्ये वाढच होत चालली आहे. यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतच सुमारे ७१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडले आहे. मागील वर्षभरात हा आकडा दीड लाखांहून अधिक होता. मध्य रेल्वेच्यापुणे विभागाकडून पुणे ते मळवली, पुणे ते बारामती, पुणे ते मिरज व मिरज ते कोल्हापूर या मार्गांवरील गाड्या, तसेच स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. त्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत. विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी ही पथके अचानक कोणत्याही रेल्वेगाडीमध्ये जाऊन तिकीट तपासणी करतात. तसेच एखादी गाडी स्थानकात आल्यानंतर गाडीतून उतरणाºया प्रवाशांचीही तपासणी केली जाते. यामध्ये विनातिकीट किंवा चुकीचे तिकीट आढळल्यास संबंधित प्रवाशाकडून कमीत कमी २५० रुपये दंड वसूल केला जातो. तसेच रेल्वेकडून तिकीट तपासणीसही स्वतंत्रपणे ही तपासणी करतात. तरीही फुकट्या प्रवाशांवर वचक ठेवण्यात रेल्वेला अपयश येताना दिसत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ या वर्षात सुमारे १ लाख ५ हजार विनातिकीट प्रवासी पकडले होते. त्यांच्याकडून पावणेसहा कोटी रुपयांची दंडवसुली केली. त्यापुढील वर्षी या प्रवाशांच्या आकडा २५ हजाराने वाढला. त्यानंतर २०१७-१८ मध्ये ८ हजारांनी तर २०१८-१९ मध्ये त्यात १४ हजार प्रवाशांची भर पडली. मागील वर्षी दीड लाखांहून अधिक प्रवासी फुकट प्रवास करीत होते. त्यांच्याकडून तब्बल ८ कोटी २० लाख रुपयांच्या दंडाची वसुली केली. यावर्षी केवळ पाच महिन्यांतच सुमारे ७१ हजार प्रवासी पकडले असून ४ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. आधीच तिकीटदर कमी असल्याने खर्चाच्या तुलनेत तोटा सहन करून प्रवासीसेवा देणाºया रेल्वेला फुकट्या प्रवाशांमुळे आणखी तोटा सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला जात असला तरी प्रत्यक्षात विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या अधिक असू शकते. प्रत्येक गाडी, प्रवाशांची तिकीट तपासणी करणे शक्य नसल्याने अनेक फुकटे प्रवासी सहीसलामत सुटतात. त्यामुळे रेल्वेचा महसूल बुडत आहे. .....मागील ५ वर्षांची फुकट्या प्रवाशांची संख्यावर्ष    फुकटे प्रवासी    दंडवसुली२०१५-१६    १,०५,२०५    ५,७८,४२,२२९    २०१६-१७    १,३०,३७९    ६,६९,८२,३०३२०१७-१८    १,३८,२७५    ७,६६,९२,९७७२०१८-१९    १,५२,२५२    ८,२०,५८,०५८२०१९-२०    ७०,९८३    ४,००,००,०००(ऑगस्टअखेर)............

रेल्वेकडून प्रवाशांना अनारक्षित तिकिटासाठी यूटीएस अ‍ॅप ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईलवरून तिकीट घेता येते. त्यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दीही कमी झाले आहे. आरक्षित तिकिटेही ऑनलाईन घेता येतात. पण तरीही प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात आहे. रेल्वेकडून सातत्याने तपासणी मोहीम राबविली जाते. कारवाई होऊनही अनेक प्रवासी तिकीट न घेताच प्रवास करतात. त्याचा रेल्वेला फटका बसत आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेticketतिकिट