शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League : सर्वोत्तम खेळ करणारा संघ ठरेल विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:12 IST

प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीत दाखल झालेल्या संघांच्या प्रशिक्षकांना विश्वास

पुणे : बाद फेरीत चुकांना संधी नसते. सर्वोत्तम खेळ करणारा संघच येथे जिंकणार. मोठ्या लढतींचा दबाब कुठला संघ व्यवस्थित हाताळतो, यावरही बरेच काही अवलंबून असते, असे मत प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीत दाखल झालेल्या संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले.हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली या संघांनी यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता यूपी योद्धाज वि. जयपूर पिंक पँथर्स यांच्यात एलिमिनेटर -१, तर पाटणा पायरेट्स वि. यू मुम्बा यांच्यात एलिमिनेट-२ लढत रंगणार आहे. या लढती म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व संघांचे प्रशिक्षक एकत्र आले होते.हरयाणाचे प्रशिक्षक मनप्रीतसिंग म्हणाले की, येथे प्रत्येक संघ जिंकायलाच आला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा प्रतिस्पर्धी कोण याचा विचार न करता जमेच्या बाजूंवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.दिल्लीचे प्रशिक्षक जोगिंदर नरवाल म्हणाले की, जो संघ चांगला खेळणार, तो जिंकणारच. आमची संघ बांधणी मजबूत असून, याचे श्रेय माझ्यापेक्षा खेळाडूंनाच आहे. हीच एकजूट आम्ही उपांत्य फेरीत दाखविणार आहोत.पाटणा संघाचे प्रशिक्षक नरेंदर रेधू म्हणाले की, या मोसमात आम्ही काही लढती अखेरच्या क्षणी जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. शेवटच्या क्षणी कच न खाणे हे आमच्या संघाचे वैशिष्ट्ये आहे.यूपी संघाचे प्रशिक्षक जसवीर म्हणाले, गेल्या मोसमात आमची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर संघात काय बदल करता येईल, याचा विचार आम्ही केला. संघात थोडे बदल केले. झालेल्या चुकांचा आढावा घेतला. त्यामुळेच तुम्ही या वेळी एक चांगला संघ बघत आहात.जयपूर संघाचे प्रशिक्षक संजीव बलियान म्हणाले की, मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा आम्हाला अनुभव आहे. दबाव हाताळण्याचे हे कौशल्या आम्हाला उपयोगी पडणार आहे. यू मुम्बाचे प्रशिक्षक घोलमरेझा माझांदरनी म्हणाले, आम्ही प्रत्येक लढतीचा आनंद घेत आहोत. आमच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीग