शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीसह 'या' 10 गावांमध्ये उद्यापासून १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी ; प्रवासी वाहतूक राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 17:12 IST

संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा : आळंदीसह आसपासच्या दहा गावांत उद्यापासून संचारबंदी

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारपासून (दि.६) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डूडूळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक अशा दहा गावांत सोहळा समाप्तीपर्यंत अर्थातच १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.          आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. एकादशी ११ डिसेंबरला तर संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह ८ डिसेंबरला आळंदीत दाखल होतील. 

              तत्पूर्वी ८ डिसेंबरला सकाळी सात वाजता तीस जणांच्या उपस्थितीत गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने कार्तिकी सोहळ्याला प्रारंभ होईल. मंदिरातील कीर्तन, जागर आदी धार्मिक कार्यक्रम पंधरा वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतील. परंपरेप्रमाणे माऊलींसमोर होणाऱ्या सेवांसाठी  संबंधित पाचच व्यक्तींना आमंत्रित केले जाणार आहे. मंदिरातील नित्योपचार पूजा नियमांचे पालन करून संपन्न होणार आहेत. यात्रा कालावधीत आळंदीकडे येणारी खाजगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळेत वारीपूर्वी आणि वारीकाळात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध केला आहे.

आळंदी शहरात तसेच माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिराकडे येणाऱ्यामार्गावर, प्रदक्षिणा रस्ता, शहर प्रवेश करणारे रस्तेही बंद केले जाणार आहेत. पुण्याहून आळंदीकडे येणाऱ्या मॅक्झीन फाटा, डुडुळगाव, चिंबळी फाटा, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता प्रवासास पूर्ण बंद राहणार आहे.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस