शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 17:41 IST

बीअारटी मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी सातत्याने हाेत असून फारशी कारवाई हाेत नसल्याने वाहनचालकांवर अंकुश राहिला नसल्याचे चित्र अाहे.

ठळक मुद्देबीअारटी मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी चालूच

पुणे : बीअारटी मार्गातून बीअारटी बसच्या व्यतिरिक्त इतर वाहन गेल्यास ते जप्त करण्याचे अादेश पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष अाणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार काहीकाळ कारवाई करण्यास सुरुवात करण्यात अाली हाेती. परंतु त्यांच्या बदलीनंतर अाता पुन्हा परिस्थिती पहिल्यासारखीच झाली असून बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा असे चित्र सध्या पाहायला मिळत अाहे.     संगमवाडी ते विश्रांतवाडी तसेच येरवडा ते खराडी या बीअारटी मार्गात अनेक खासगी वाहनांची घुसखाेरी हाेत अाहे. यावर अाळा घालण्यासाठी सुरुवातील  ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात अाली. या ट्रॅफिक वार्डनलाही अनेक वाहनचालक जुमानत नाही. काही वाहनचालकांनी या ट्रॅफिक वार्डनला उडावल्याच्या घटनाही या ठिकाणी घडल्या अाहेत. या मार्गातील खाजगी वाहनांच्या घुसखाेरीमुळे अनेक अपघातही या मार्गांमध्ये झाले अाहेत. त्यात अनेकांना अापल्या प्राणांना मुकावे लागले. पीएमपीचे तत्कालिन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी बीअारटी मार्गात घुसखाेरी करणारी वाहने जप्त करण्याचे अादेश काढले हाेते. त्यानंतर काही दिवस कारवाई सुद्धा करण्यात अाली. परंतु सध्या परिस्थिती पूर्वीसारखीच झाली असून किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त खाजगी वाहने या मार्गातून जात असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे बीअारटी मार्ग अाणि बस जलद वाहतूक सेवा हे केवळ फार्स बनून राहिले अाहेत.     संगमवाडीवरुन विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या बीअारटी मार्गात अात्तापर्यंत अनेक अपघात झाले अाहेत. या मार्गात घुसखाेरी केलेली वाहने वेगात जात असल्याने समाेरुन येणाऱ्या बसला धडकून अपघात घडण्याची शक्यता अाहे. वेगामुळे अपघात हाेऊन या मार्गाचे डिव्हायडर्स तुटल्याच्या घटनाही या ठिकाणी घडल्या अाहेत. वाहनचालकांमध्ये जागृती हाेत नसून वार्डनला दमदाटी करुन या मार्गात वाहने घुसवली जात अाहे. त्यामुळे या उर्मट वाहनचालकांपुढे पीएमपी प्रशासन हतबल झाले असून त्यांना राेखायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला अाहे. या ठिकाणी फाटक बसविण्याचा पीएमपीचा विचार असून ताे कधी पुर्नत्वास येताेय हे अाता बघावे लागणार अाहे.     याबाबत बाेलताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने म्हणाले, बीअारटी मार्गात घुसखाेरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत अाहे. कालच या मार्गातून जाणाऱ्या 20 वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. त्याचबराेबर खास बीअारटीसाठी एका बीअारटी सेलची स्थापना केली असून त्या माध्यमातून बीअारटी मार्गातील प्रश्न साेडविण्यात येणार अाहेत. सध्या चालू असलेली कारवाई येत्या काळात अाम्ही अधिक गतीने करणार अाहाेत. फाटकाबाबतची अंमलबजावणी हा पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारितला प्रश्न असून त्यावरही विचार विनिमय करण्यात येत अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेPune BRTपुणे बीआरटी