शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संशयामुळे रूग्णांना दाखल करून घेण्यास खासगी हॉस्पिटलचा नकार;  महापौरांकडून कारवाईचा इशारा         

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:57 IST

सर्दी, खोकला, धाप लागणारे वयोवृध्द तथा मधुमेह व रक्तदाब असलेल्या रूग्णांनाही उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार

ठळक मुद्देखासगी हॉस्पिटलमध्ये खाटा राखीव असताना ही भूमिका निषेधार्ह 

निलेश राऊत- पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग शहरात मोठ्या प्रमाणात झाल्याने, सर्दी, खोकला, धाप लागणारे वयोवृध्द तथा मधुमेह व रक्तदाब असलेल्या रूग्णांनाही उपाचारासाठी दाखल करून घेण्यास खासगी हॉस्पिटलकडून नकार दिला जात आहे. परिणामी या लॉगडाऊनच्या काळात संबंधित रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागत असून, कोविड-१९ शी दूरमात्र संबंध नसलेल्या बहुतांशी रूग्णाना विनाकारण ससून व नायडू हॉस्पिटलकडेच धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गंभीर दखल घेतली असून, खाजगी हॉस्पिटलने अशाप्रकारे रूग्णांना नाकारण्याचे प्रकार सहन केले जाणार नसल्याचे सांगून संबंधित हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.    हडपसर येथील सैय्यदनगर परिसरातील ६५ वर्षीय व्यक्ती आजारी पडल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले़ तेव्हा संबंधित रूग्णाची प्रथम ससूनमधून कोविड-१९ तपासणी करून आणा असे सांगितले गेले़ त्यामुळे त्या रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना ससूनमध्ये तपासणी करून आणले तेव्हा त्या रूग्णाचा कोविड -१९ (कोरोना संसर्ग) चा अहवाल निगेटिव्ह आला़ हा अहवाल घेऊन रूग्णाचे नातेवाईक पुन्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले परंतू त्या रूग्णास दाखल करून घेण्यास त्या हॉस्पिटलसह पुण्यातील नामांकित हॉस्पिटलनेही नकार दिला़     असाच दुसरा एक प्रकार दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात घडला़ श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने एका ज्येष्ठ नागरिकास लॉकडाऊन असल्यामुळे जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी नेले़ या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्या ज्येष्ठ व्यक्तीने रात्री रक्तदाबाची गोळी खाल्ली नव्हती हेही नातेवाईकांनी सांगितले़ परंतू सदर हॉस्पिटलने त्यांना आमच्याकडे बेड खाली नाही म्हणून दाखल करून घेण्यास नकार दिला़ परिणामी लॉकडाऊनमुळे त्या रूग्णाच्या नोतवाईकांनी पोलीस परावनग्या, गाडी भाड्याने घेणे व आदी आटापिटा करून रूग्णास मध्यवर्ती भागातील इतर चार खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले पण तिथेही त्यांना अशाच नकारास सामोरे जावे लागले़ दरम्यान त्या रूग्णास श्वास घेण्यास आणखीनच त्रास झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी ओळखीतील प्रशासकीय अधिकाºयाच्या मदतीने ससूनमधील एका डॉक्टरकडून तपासणी करून घेतली़ त्यावेळी केवळ रक्तदाबाची गोळी घेतली गेली नसल्याने व लघवी न झाल्याने त्यांना धाप लागल्याचे आढळून आले़ त्या रूग्णावर जुजबी उपचार करून त्यांना लागलीच ठिकही करण्यात आले़ परंतू साध्या उपचाराने बºया होणाºया या रूग्णास केवळ कोविड-१९ च्या भितीपोटी अनेक मोठ्या व नामांकित हॉस्पिटलनेही नाकारले़     या दोन उदाहरणांसह शहरात नित्याने असे प्रकार होत असून, कोविड-१९ च्या भितीने अनेक खाजगी हॉस्पिटलने आपल्या ओपीडीही बंद केल्या आहेत़ यामुळे कोविड-१९ शी दूरामात्र संबंध नसलेल्या अनेकांना  कोरोना आपत्ती काळात काही खाजगी हॉस्पिटलकडून नाकारण्याची भूमिका अयोग्य असल्याचे बोलले जात आहे़----------------------------खाजगी हॉस्पिटलमध्ये खाटा राखीव असताना ही भूमिका निषेधार्ह सैय्यदनगर येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोव्हिड-१९ चा अहवाल निगेटिव्ह आला असताना शहरातील प्रसिध्द खाजगी हॉस्पिटल संबंधित नागरिकाला दाखल करून घेत नाहीत़ याबाबत पालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनाही आयुक्तांच्या सूचनेनुसार माहिती दिली़ पण त्या अधिकाºयानेही याची गांर्भियाने दखल घेतली नाही व पुन्हा फोनही घेतला नाही़ असा आरोप सय्यदनगर प्रभागातील नगरसेविका रूकसना इनामदार यांचे पती शमशउद्दीन इनामदार यांनी लोकमतशी बोलताना केला़ महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी हॉस्पिटलला काही खाटा राखीव ठेवण्यास सांगितले असताना, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे़ त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत लक्ष घालून नागरिकांना खाजगी हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावेत़ अन्यथा संबंधित रूग्ण व त्यांच्या नातेवाईक महापालिकेत दरवाजाजवळ आणून बसवू असा इशारा नगरसेविका रूकसना शमशउद्दीन इनामदार यांनी दिला आहे़ -------------रूग्णांना नाकारल्यास कठोर कारवाई करू - महापौरशहरामधील काही खाजगी हॉस्पिटलमधील ओपीडी बंद करण्यात आल्या आहेत का, तसेच रूग्णांना नाकारण्याच्या झालेल्या प्रकारांची चौकशी करण्यात येणार आहे़ दरम्यान कोरोनाच्या आपत्ती काळात खाजगी हॉस्पिटलने रूग्णांना नाकारू  नये़ असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत असून, कोणी रूग्ण नाकारल्यास संबंधित हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे़

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौरhospitalहॉस्पिटल