शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:39 IST

नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली

- अंबादास गवंडीपुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ७१४ खासगी रुग्णालयांची तपासणी केली आहे. यामध्ये तब्बल ७६ टक्के रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाने महिनाभरात सुमारे ७१४ रुग्णालयांची तपासणी केली. त्यात ७६ रुग्णालयांनी नियमांचे पालन न केल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणी झाली आहे का, याची तपासणी केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेले दरपत्रक या बाबींची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयाकडील अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबद्दल माहिती घेतली जात आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी दिली.

सुधारणेसाठी महिन्याचा कालावधी

नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. एक महिना पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून नोटीस पाठवलेल्या रुग्णालयांची पुन्हा तपासणी करून सुधारणा झाल्याची खात्री केली जाणार आहे. रुग्णालयांनी सुधारणा केली नसल्यास त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे पाऊल आरोग्य विभाग उचलणार आहे. 

खासगी रुग्णालयांची तपासणी

एकूण खासगी रुग्णालये - ८४९

तपासणी झालेली रुग्णालये - ७१४

नोटीस पाठवलेली रुग्णालये - ७६

महापालिकेककडून खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू असून, उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, रुग्ण हक्क संहिता नसणे यासह इतर नियमांचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले. याप्रकरणी ७६ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. - डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिकाhospitalहॉस्पिटल