शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कदाचित पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी कारवाई केली असेल; चंद्रकांत पाटलांचा अंगुलीनिर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 15:46 IST

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते.

पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात गोवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. तसेत सरकारने ईडीला सूडबुद्धीने गुन्हा नोंदवायला लावल्याचा आरोप खुद्द पवारांनी केला होता. यावर मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. पोलिसांच्या सूचनेवरून पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्ण जाहीर केला आणि आज या राजकीय नाट्याचा समारोप झाला. मात्र, पुण्याची पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. यावेळी त्यांनी शिखर बँकेच्या चौकशीसह सिंचन घोटाळ्यावरून जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका काढली होती. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीत कुरघोड्या सुरू असल्याचे वातावरण होते. मात्र, नंतर भाजपाचे सरकार आले आणि नंतरची पाच वर्षे सरकारने यावर एकही शब्द उच्चारला नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे नाव ईडीच्या गुन्ह्यामध्ये आल्याने पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. 

पुण्यातील पूरग्रस्तांनी विरोध केल्यानंतर काढता पाय घ्यावे लागलेले चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावरील ईडी प्रकरणावर भाष्य केले. या देशात ईडी, सीबीआय, कोर्ट यात सरकार लक्ष घालू शकत नाही. यामुळे यात भाजप सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले. लोक आता हुशार झालेत. आकसाने केले म्हणून म्हणून इव्हेंट करतात. छगन भुजबळ यांना अटक झाल्यावर का नाही केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

शिखर बँकेचे राजकारण काँग्रेसने केले. सगळ्या विषयांचा संबंध सरकारशी जोडणे चुकीचे आहे. कदाचित पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी कारवाई केली असेल, मला माहिती नाही असे म्हणत या प्रकरणामागे काँग्रेसचा हात असल्याचा टोला त्यांनी लगावला. २०१० साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार असताना राज्य सहकारी बँकेवर शरद पवार यांना मानणार सरकार होत. त्यांच्या सल्ल्याने चालत होत. त्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याचे ते म्हणाले. 

विरोध कशासाठी ?परवा रात्री पुण्यामध्ये ढगफुटी झाली. यामध्ये हजारो गाड्या पाण्यात गेल्या तर जवळपास 12 जण वाहून गेले. मात्र, सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. यामुळे आता काय फोटो काढायला आलात का, असा संतप्त सवाल पुणेकरांनी केला. यामुळे या रोषापुढे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: मानवी साखळी करत चंद्रकांत पाटलांना बाहेर काढले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस