शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कैदी म्हणतात, बाहेर नको रे बाबा, कारागृहातच बरे; ५३ गुन्हेगारांनी पॅरोल नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:21 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरात महाराष्ट्र सर्वाधिक त्रस्त आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचा फटका सुरुवातीला राज्यातील कारागृहांना बसला होता.

विवेक भुसे -पुणे: राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असताना कारागृह मात्र दुसऱ्या लाटेत जवळपास कोरोनामुक्त राहिले आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर कोणत्याही आस्थापनांपेक्षा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच कैद्यांचे लसीकरण अतिशय वेगाने झाले आहे. त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा कारागृहातच राहणे कैदी पसंत करीत आहेत. तातडीचा पॅरोल मिळाला असतानाही ५३ गुन्हेगारांनी पॅरोल नाकारून कारागृहात राहणे पसंत केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरात महाराष्ट्र सर्वाधिक त्रस्त आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचा फटका सुरुवातीला राज्यातील कारागृहांना बसला होता. त्याचा कारागृह प्रशासनाने यशस्वी मुकाबला केला. या अनुभवातून शिकत कारागृह प्रशासनाने दुसऱ्या लाटेच्या काळात सुरुवातीपासूनच कडक उपाय राबविले. त्यातून आज राज्यातील कारागृहात कैद्यांमध्ये फक्त ७७ सक्रिय रुग्ण असून, १४ कर्मचारी बाधित आहेत.राज्यातील कारागृहात दुसऱ्या लाटेला थोपविण्याचे काम केवळ लसीकरणच करू शकेल, असे लक्षात घेऊन राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी कालबद्ध लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. राज्यभरातील सर्व कारागृहात मिळून जवळपास ३४ हजार कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. कारागृहातील तब्बल २१ हजार कैद्यांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. त्याचबरोबर कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ९५ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले नाही.राज्यातील कारागृहात मिळणारे चांगले जेवण, आरोग्य सुविधा आणि लसीकरण यामुळे अधिक सुरक्षित वातावरण कारागृहात असल्याचे कैद्यांना जाणवते. 

उच्च न्यायालयाने केले कौतुककोरोना संसर्गावर काय उपाययोजना केल्या याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावेळी शासनाने केलेल्या उपाययोजना आणि लसीकरण याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावेळी उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केल्याचे सुनील रामानंद यांनी सांगितले. 

टॅग्स :jailतुरुंगPuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याPrisonतुरुंग