शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील महिलांनी फुलवला हिरवा मळा

By admin | Updated: March 8, 2016 01:15 IST

जगण्याच्या धांदलघाईत नकळत हातून एक चूक गुन्हा झाला आणि थेट कारागृहात बंदी म्हणून त्या जगू लागल्या. पण बंदीवानाचे जिणे आले तरी कारागृहात खितपत पडून

पुणे : जगण्याच्या धांदलघाईत नकळत हातून एक चूक गुन्हा झाला आणि थेट कारागृहात बंदी म्हणून त्या जगू लागल्या. पण बंदीवानाचे जिणे आले तरी कारागृहात खितपत पडून राहण्यापेक्षा त्यांनी स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच या कैदी महिलांनी दुष्काळातही हिरवा मळा फुलवला. कारागृहाच्या भाजीपाल्याचा प्रश्न तर मिटलाच पण या महिलांच्या मेहनतीने कारागृह उत्पादनातही विक्रमी वाढ करून दाखविली. आयुष्यातील एका चुकीची शिक्षा भोगून परिमार्जन होत असतानाच येरवडा येथील खुल्या कारागृहातील महिला कैद्यांनी कारागृह अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनाने आयुष्याला एक चांगली दिशाही देऊ केली आहे. महिला खुल्या कारागृहात एकूण २७८ कैदी आहेत. त्यात १७३ महिलांना शिक्षा झाली असून १०५ आरोपी न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. महिलांंची १३ लहान मुलेही कारागृहात आहेत. दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, झांबिया आणि बांगलादेश येथील काही महिला कैदीही कारागृहात आहेत. शेतीबरोबरच लहान-मोठ्या वस्तूंची निर्मिती कारागृहात केली जाते. खुल्या कारागृहाने एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ९ लाख ८६ हजाराहून अधिक उत्पादन काढले असून, मार्च महिन्यातील उत्पादनासह हा आकडा ११ लाखापर्यंत जाणार आहे. कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानिरीक्षक डॉ. शहाजी सोळुंके , उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील महिला कैद्यांसाठी उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षा भोगत असलेल्या कैदी महिलाच इतर महिला कैद्यांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. अनेक महिन्यांपासून योगा करत असल्यामुळे काही महिला कैद्यांचा मधुमेहाचा व पाठीच्या कण्याचा त्रासही कमी झाला आहे. महिला खुले कारागृहच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटराव आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी पल्लवी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. कदम म्हणाल्या, कारागृहातील महिला कैदी दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शेतीमध्ये काम करतात. बैलांच्या मदतीने केली जाणारी सर्व अवजड कामे याच महिला कैदी करतात. सध्या ४२ महिला कैदी शेतीत काम करत आहेत.