शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

सबजेलमधून खिडकीचे गज कापून कैदी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:46 AM

जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेतलेल्या आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली.

पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेतलेल्या आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. पोलीस कोठडीमध्ये असताना सोमवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून हे चोरटे पसार झाले. वास्तविक पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे या चोरट्यांना पळून जाण्याची संधी मिळाल्याची चर्चा असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी कोठडीतून पळालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांदळे आणि गोयेकर हे दोघेही एका गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहामध्ये कोठडीत होते. या दोघांनी राजगुरुनगर पोलिसांच्या हद्दी त केलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी खेड पोलिसांनी या दोघांना न्यायालयीन कोठडीमधून गुन्ह्यात शनिवारी वर्ग करुन घेतले होते. अटकेची कारवाई करीत त्यांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून मिळवली होती. त्यानुसार हे कोठडीमध्ये होते. त्यांच्याकडे तपास सुरु होता.रविवारी रात्री खेड तहसील कार्यालयाच्या आवारातील पोलीस कोठडीमध्ये या दोघांना ठेवण्यात आले होते. जवळच पोलीस उपअधिक्षकांचेही कार्यालय आहे. मध्यरात्री आरोपींनी कोठडीच्या पाठीमागील भिंतीला असलेल्या खिडकीचे गज कापले. या कोठडीमध्ये त्यावेळी सहाजण होते. आरोपींनी या खिडकीवाटे बाहेर उड्या टाकल्या. स्वच्छतागृहाच्या बाजुने आरोपी पसार झाले. दरम्यान, कोठडीतील काही गुन्हेगारांनी त्यांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक गजाजन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कर्तव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.