शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

‘लोकसभा’ काळात बारामतीत होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:26 IST

बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामतीचा राष्ट्रवादीचा गड हा कोणत्याही परीस्थितीत ढासळणारच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील मोठी सभा ...

बारामती: लोकसभा निवडणुकीत बारामतीचा राष्ट्रवादीचा गड हा कोणत्याही परीस्थितीत ढासळणारच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील मोठी सभा बारामतीत होणार आहे. आजपासूनच भाजप कार्यकर्त्यांनी घरात मत परीवर्तनासाठी कामाला लागावे. बारामतीत आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला विसर्जित करुन त्यांच्या नेत्यांचा घमंड नेस्तनाबूत करा. चांद्यापासून बांद्यापर्यंत या पराभवाचा संदेश गेल्यास पुर्ण राज्यातच ‘राष्ट्रवादी’चे विसर्जन होईल,अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या.

बारामती येथे लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बावनकुळे पुढे म्हणाले, बारामतीचा पुढचा खासदार हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या असली शिवसेना युतीचा असेल. हिंदुत्ववादी शिवसेना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नको आहे, त्यांना राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर चालणारी शिवसेना हवी आहे. मात्र, शिंदे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर भाजप आगामी निवडणुका लढवून क्रमांक एकचा पक्ष होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

परिसरात काही साखर कारखान्यांच्या निवडणुका आठ-आठ वर्षे होत नाहीत. बोगस मतदान करुन, दुध संघ, कारखाने ताब्यात ठेवले आहेत. कोणाचे ऑडीट नाही, गरीबांवर अन्याय करण्याचे काम सुरु आहे. जेवढे नागपुरवर लक्ष तेवढेच बारामतीवर लक्ष देणार, त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, असे बावनकुळे म्हणाले.

बारामती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सांगतात. ४० वर्ष तुम्ही सत्तेत होता. येथील जनतेने मते दिल्याने निवडून आला. त्यामुळे मतांच्या बदल्यात विकासकामे करण्याचे कर्तव्यच आहे,विकासकामे केली म्हणजे उपकार केले का, असा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला.

....बारामतीत उदघाटनासाठी नितीन गडकरी यांना आणणारकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केलेल्या कामांचे श्रेय घेवून फलक लावण्याचे प्रकार सुरु आहेत. आमच्या सरकारने केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नका. त्यासाठी बारामतीच्या कामांचे उदघाटन करण्यास गडकरी यांनाच आणणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी