टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे भाव स्थिर

By admin | Published: March 17, 2017 02:02 AM2017-03-17T02:02:30+5:302017-03-17T02:02:30+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे बाजारभाव तेजीत निघाले. गहू, बाजरी, ज्वारी, मका यांचे बाजारभाव स्थिर राहिले.

Prices of tomato, brinjal, chili, pumpkin, cilantro, etc. are stable | टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे भाव स्थिर

टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे भाव स्थिर

Next

दौंड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, कोथिंबीर यांचे बाजारभाव तेजीत निघाले. गहू, बाजरी, ज्वारी, मका यांचे बाजारभाव स्थिर राहिले. कारली, भेंडी, गवार, काकडी, दोडका यांचे बाजारभाव आवक घटल्याने वाढले. लिंबाची आवक घटून बाजारभाव स्थिर राहिल्याची माहिती सभापती रामभाऊ चौधरी, सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (४१) ६०-१२०, वांगी (२५) ४०-७०, दोडका (४) १५०-२५०, भेंडी (७) २००-३००, कारली (५) १५०-२५०, हिरवी मिरची (२३) १५० ते ३००, गवार (२) ३०० ते ५००, भोपळा (३२) ३० ते ४०, काकडी (२८) १०० ते २००, कोथिंबीर (८८४० जुड्या) १०० ते ४५०, मेथी (३२४० जुडी) २००-५००. दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (९५८) १५०० ते १९००, ज्वारी (२३९) १३७५ ते २४००, बाजरी (२३) १२५१ ते १८५१, मका (१७) १४०० ते १४००, तूर (११) ३४५० ते ३६००, लिंबू (१४१) २०० ते ३८०. केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (१२०५ ) १५०० ते १९००, ज्वारी(१७८) १३७५-२४५१, बाजरी (१४) १२५१ ते १८११, हरभरा (५८) ४०००ते ४७००, मका लाल/पिवळा (९) १४०० ते १८००, तूर (७) ३४५०-३५५०. (वार्ताहर)

Web Title: Prices of tomato, brinjal, chili, pumpkin, cilantro, etc. are stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.