भेंडी, टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, घेवड्याचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:55+5:302021-02-15T04:09:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकीच झाली आहे़ मात्र, मागणी वाढल्याने भेंडी, ...

Prices of okra, tomato, cucumber, cauliflower and lentils increased | भेंडी, टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, घेवड्याचे दर वाढले

भेंडी, टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, घेवड्याचे दर वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकीच झाली आहे़ मात्र, मागणी

वाढल्याने भेंडी, टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, घेवड्याचे दर वाढले. दरम्यान अन्य सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि.१४) ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १३ ते १४ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक गुजरात आणि कर्नाटकातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मटार १४ ते १५ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातधून ७ ते ८ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ४० ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १५०० ते १६०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, भुईमुग शेंगा ५० ते ६० पोती, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, श्रावणी घेवडा ३ ते ४ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक इतकी आवक झाली.

--------

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २५-४० ३५-५०

बटाटा १०-१४ २०-३५

टोमॅटो १०-१४ २०-२५

भेंडी ३०-४५ ४०-५०

गवार ३५-४० ४०-५०

मिरची ३५-५५ ४५-६०

कोथींबीर ०७-१० १०-१५

मेथी ०३-०७ १०-१५

मटार २५-२६ ४०-५०

गाजर १५-१८ २०-२५

--

थंडीमुळे पालेभाज्यांचे दर वाढले

मार्केटयार्डात रविवारी कोथींबीर, शेपू, कांदापात, करडई, मुळे, पालक आणि हरभरागड्डीच्या दरात वाढ झाली. तर मेथी, चाकवत, पुदीना, अंबाडी, राजगिरा आणि चुक्याच्या भावात घट झाली आहे तर चवळईचे दर स्थिर होते.

रविवारी मार्केटयार्डात कोथींबीरीच्या एक लाख जुड्यांची मेथीची ८० हजार जुड्यांची आवक झाली. शेपूचे दर गड्डीमागे पाच रुपये, मुळे चार रुपये, कांदापात दोन रुपये, कोथींबीर, करडई, पालक आणि हरभरा गड्डीच्या दरात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे तर अंबाडी आणि चुका तीन रुपये, चाकवत आणि राजगिरा प्रत्येकी दोन रुपये, मेथी एक रुपया आणि पुदीनाच्या गड्डीच्या दरात पन्नास पैशांनी घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Web Title: Prices of okra, tomato, cucumber, cauliflower and lentils increased