शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:14 IST

दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे

पुणे : लोकसंख्या वाढीमुळे रेल्वेची प्रवासी संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी अपुरे पडू लागले आहे. अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून खडकी आणि हडपसर स्थानकांचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. या दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पुणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रेल्वे सुविधांचा विस्तार झाला नाही. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या रेल्वेस्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उरुळीला नवीन मेगा टर्मिनल उभारण्यात येणार आहे. याच बरोबर खडकी आणि हडपसर या स्थानकांचा विकास करून त्यांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे या स्थानकांची प्रवासी क्षमता वाढणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील ताण कमी करून पर्यायी स्थानकांचे जाळे निर्माण होणार आहे. तसेच, पुणे-नगर रेल्वेमार्गाच्या प्रस्तावालाही गती देण्यात आली आहे. याच बरोबर पुणे-मुंबई या दरम्यान गाड्यांची संख्या वाढविणे, उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडणाऱ्या गाड्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांना असा होणार फायदा...

- पुणे स्थानकावर रेल्वेची संख्या जास्त असल्याने फलाट उपलब्ध न होणे, नव्या गाड्या सुरू न होणे असे प्रकार घडतात ते बंद होतील.- फलाट उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वेगाड्यांना सिग्नलवर थांबावे लागते.- यामुळे २० ते २५ मिनिटे वाया जातात.- स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू होतील.- पुणे स्थानकावरून गाडी लवकर सुटेल, त्यामुळे फलाट उपलब्ध होतील.असे असणार टर्मिनल...- खडकी स्थानकावर सध्या चार फलाट आहेत.- त्यापैकी दोन फलाट रेल्वे वाहतुकीसाठी वापरले जातात.- तिसरा रेल लेव्हल फलाट आहे. येथून सैन्याच्या रेल्वेची वाहतूक होते.- चौथा फलाट मालगाड्यांसाठी वापरला जातो.- टर्मिनल केल्यावर चारही फलाट प्रवासी रेल्वेसाठी वापर होणार.

हडपसर टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम सुरु आहे. - डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकHadapsarहडपसरKhadkiखडकीpassengerप्रवासी