राष्ट्रपती प्रणव मुखज्रीचे पुण्यात आगमन
By Admin | Updated: November 25, 2014 23:52 IST2014-11-25T23:52:58+5:302014-11-25T23:52:58+5:30
दोन दिवसांच्या पुणो भेटीवर आलेले भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मंगळवारी लोहगाव विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने सांयकाळी 7.3क् वाजता आगमन झाले.

राष्ट्रपती प्रणव मुखज्रीचे पुण्यात आगमन
पुणो : दोन दिवसांच्या पुणो भेटीवर आलेले भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मंगळवारी लोहगाव विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने सांयकाळी 7.3क् वाजता आगमन झाले. विमानतळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
राष्ट्रपतींच्या स्वागताच्या वेळी विमानतळावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त सतीश माथूर, तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)