शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 15:09 IST

तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशानाट्य प्रकारांची जडणघडण शोधली.

पुणे :  ’पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठअभ्यासक डॉ. तारा भवाळकरयांची निवड करण्यात आली  आहे. १३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालय यांच्या वतीने आठव्या ’पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’चे आयोजन शनिवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता  स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंदजोशी, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक विरेंद्र चित्राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  याप्रसंगी मसापच्या खजिनदार सुनिताराजे पवार उपस्थित होत्या. डॉ. तारा भवाळकर प्रामुख्याने वैचारिक लेखन करणा-या एक मराठी लेखिका आहेत. भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलमाध्ये भाग घेतलाआहे.     तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशानाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैध्दांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. आपल्या लोकसाहित्यात आणि लोकपरंपरेत निसर्गाची पूजा केलेली दिसते. माणूस आणि निसर्ग यांच्यातील सौदार्हपूर्ण नात्याचे संदर्भ वारंवार येतात. ताराबाइंनी नेहमीच आपल्या लेखनातून त्याचा पुरस्कार केलेला दिसतो.यंदाचे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन अनेक कार्यक्रमांनी रंगणारआहे. यातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग लक्षणीय असून,त्यांच्या पारितोषिक विजेत्या साहित्याचे सादरीकरण होणारआहे. महोत्सवाचा विषय ’लॅस्टिकलानकार, वसुंधरे लाहोकार’हा असून, संमेलनातील विविध ठराव महाविद्यालयीन युवक मांडणार आहेत.     संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी  १०.३० वाजता संमेलनाचे उदघाटन होणार असून,  संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर  विद्यार्थ्यांचे पारितोषिकप्राप्त साहित्यवाचन, ’प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासूर’ यावर  डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे व्याख्यान, बाबा परिट (सांगली), आप्पासाहेब खोत (कोल्हापूर) निसर्ग कविता तर उध्दवकानडे (पुणे), कल्पना दुधाळ (उरळीकांचन) शिवारातल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत.  संंमेलनाचा समारोप साहित्यसंमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या भाषणाने होणार आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरण