शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे : प्रभा अत्रे यांची विशेष मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 20:59 IST

शास्त्र आणि परंपरा यांच्याकडे डोळसपणे पाहत संगीत प्रस्तुतीकरण करणे, ही कलाकाराची जबाबदारी असते....प्रभा अत्रे

ठळक मुद्देस्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार

प्रज्ञा केळकर-सिंग गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी रागसंगीतातील बारकावे, सद्यस्थितीत कलाकारांसमोरील आव्हाने, संगीत प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांच्यातील संबंध याबाबत नेमकेपणाने भाष्य करत रसिकांना रागसंगीताचा प्रवासच घडवला.

..............................

लोकमतच्या वाचकांसाठी त्यांचे अध्यक्षीय मनोगत सविस्तर स्वरुपात : आजवर इतक्या दूर सुरांच्या वाटेवर मी माझ्या आनंदासाठी चालत राहिले. या वाटचालीत रसिकांनाही आनंद दिल्याचे समाधान वाटते. या वाटेवर थांबता येत नाही, चालतच राहावे लागते. शास्त्रीय संगीताचा वारसा जबाबदारीने, जाणतेपणाने पुढे नेणा-या कलाकारांमध्ये अश्विनीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. बहुतेक लोकांना संगीत केवळ ऐकायला आवडते, संगीतशास्त्र, त्यावरील चर्चा, तंत्र आवडत नाही. संगीतासारख्या अमूर्त कलेला समजून घेण्यासाठी वाचन, चर्चा या गोष्टी आवश्यक आहेत. कलाकार आणि श्रोते जेव्हा एका स्तरावर येतात, तेव्हा निर्मितीचा स्तरही उंचावतो. संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे असते. या नात्यात आज दुरावा निर्माण झाला आहे. शास्त्र आणि परंपरा यांच्याकडे डोळसपणे पाहत संगीत प्रस्तुतीकरण करणे, ही कलाकाराची जबाबदारी असते. विज्ञान-तंत्रज्ञान, झपाट्याने बदलणारी जीवनपध्दती, राजकीय अस्थिरता, सामाजिक उदासिनता, निष्क्रियता, बाहेरचे सांस्कृतिक आक्रमण या परिस्थितीत शास्त्रीय संगीत जपणे, जिवंत ठेवणे, संगीताचा आत्मा सुरक्षित ठेवून समृध्द करण्याचे मोठे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. संगीतात काळानुसार बदल होत असतात. प्रस्तुतीकरणाबरोबर शाास्त्रानेही बदलणे आवश्यक असते. कलेचा प्रवास परिपक्वतेच्या वाटेवर सतत सुरु असतो. या प्रवासात कलास्वरुपात अनेक स्थित्यंतरे होत असतात, त्यांची नोंद घ्यायची असते. परंतु, वर्तमानकाळातील आविष्कारासाठी सर्वस्वी मागचे संदर्भ घेणे चुकीचे ठरु शकते. विकासाच्या मार्गावर मूळ स्त्रोतापासून वर्तमान आविष्कार दूर गेला नाही ना, एवढीच काळजी घ्यायची असते. विशिष्ट नियमांच्या आधारे एखादी कलाकृती निर्माण होते, तेव्हा ते नियम निश्चित करावे लागतात, कसोशीने पाळावे लागतात. नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आले पाहिजे. ती सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे; आमच्या घराण्यात आहे तेच बरोबर, अशी भूमिकेमुळे शास्त्रीय संगीताच्या राग-रुपांमध्ये आज एकवाक्यता राहिलेली नाही. प्रत्येक घराण्यानुसार एखाद्या रागाच्या प्रस्तुतीला निदान सर्वांनी मान्यता तरी द्यावी. विरोध करणे, गोंधळ निर्माण करण्याचेच काम आज सुरु आहे. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे संगीत शास्त्रात काही घडू शकते, हे त्यांना उमगतच नाही. निदान संगीतकलेच्या विकासासाठी त्यांनी एकत्र यायला हवे. मानकीकरणासाठी पाऊल उचलायला हवे. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या ो, द्वेषाचे संबंध आणि संवाद असतात. स्वररेषांनी बनलेल्या लहान-मोठ्या आकृत्या, त्यांचे सौंदर्य, मोहक चाल, भावदर्शन या सा-यातून रागाची सुंदर मूर्ती आकार घेते. स्वत:च्या व्यक्तिमत्वाचेही ती निवेदन करत असते. या दृष्टीकोनातून रागसंगीत ऐकले, संगीताची भाषा शिकून घेतली तर आपण रागनिर्मितीच्या खूप जवळ जाऊ शकतो. एका व्यापक दृष्टीकोनातून प्रस्तुतीकरण आणि शास्त्राचा अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय संगीताने जागतिक मंचावर निर्माण केलेले स्थान बळकट करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पुढची पिढी या दृष्टीने विचार करेल, अशी आशा वाटते.चित्रकाराच्या दृष्टीतून चित्र अदृश्य संगीत असते आणि संगीतकाराच्या दृष्टीतून संगीत हे अमूर्त चित्र असते. संगीत आणि चित्रकलेचा अत्यंत जवळचा संबंध आपण समजून घ्यायला हवा. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणूनच, संगीताचा अभ्यास वेगवेगळया दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत