शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

गुन्हेगारीचे तब्बल ३०० हॉट स्पॉट, पोलिसांकडे यादी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 2:38 AM

नियंत्रण कक्षाकडून अभ्यास : पोलिसांची संख्या वाढविणार

पुणे : शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉल्सचा तांत्रिक अभ्यास व त्याचे विश्लेषण करून शहरात जेथे जास्त गुन्हेगारी घटना घडतात, अशी ३१० ठिकाणे हॉट स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत़ या कॉल्सची वर्गवारी करून त्याद्वारे गुन्हेगारी रोखण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचे अस्तित्व जास्तीत जास्त कसे राहील, हे निश्चित करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़ के . व्यंकटेशम यांनी सांगितले़

शहरात घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी नागरिक नियंत्रण कक्षाला फोन करीत असतात़ या कॉल्सचा डाटा बेस तयार करण्यात येत आहे़ कॉल्स येणारे शहरातील ठिकाण, वेळ आणि गुन्ह्यांचा प्रकार आदींबाबत माहिती संकलित करण्यात आली आहे़ मागील तीन महिन्यांत अधिकाधिक कॉल्स येणारी ३१० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे़ पुढील टप्प्यात शारीरिक हल्ले, खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा विविध गुन्ह्यांचे प्रकार कोणत्या भागात कधी झाले, याचे विश्लेषण केले जाणार आहे़ त्यानंतर मालमत्ताविषयक गुन्हे, वाहनचोरीविषयक गुन्हे आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे़ ही माहिती संकलित झाली, की त्यावरून हे गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या भागात काय उपाययोजना आवश्यक आहेत, पोलिसांची गस्त व त्या परिसरातील उपस्थिती कशी वाढविता येईल, याचा विचार केला आहे.चारित्र्य पडताळणी आता ११ दिवसांतपासपोर्टसाठी केलेल्या जाणाºया अर्जावर पोलिसांकडून केली जाणारी चारित्र्य पडताळणी आता ११ दिवसांत पूर्ण केली जात आहे़ यापूर्वी हा कालावधी ३६ दिवस इतका होता़ सध्या केवळ ज्यांच्यावर वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत, अशांचे अर्ज प्रलंबित राहतात़ इतर अर्जांवरील पडताळणी ११ दिवसांत पूर्ण होते, असे सांगण्यात आले.गौतम नवलखा यांची नजरकैद वाढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातसंशयित माओवादी गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नजरकैदेत वाढ करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे़ या पाच जणांना न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला होता़ या कालावधीत पुणे पोलीस त्यांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पोलीस आयुक्त के . व्यंकटेशम यांनी सांगितले़अनावश्यक कॉल्स केल्यास कारवाईपोलीस नियंत्रण कक्षामध्ये येणाºया अनावश्यक कॉल्सची संख्या कमी व्हावी, यासाठी आयव्हीआरएस प्रणाली सुरू केली आहे़ त्यामुळे कॉल्सचे प्रमाण ५ ते १० टक्के इतके घटले आहे़ असे असले तरी नियंत्रण कक्षाला विनाकारण कॉल करून कर्मचाºयांना जाणिवपूर्वक त्रास देत आहेत, अशा मानसिक रुग्णांना वगळून इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे़, असे डॉ़ के. व्यंकटेशम यांनी सांगितले़

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस