शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

आमदार हेमंत रासने 'इन अ‍ॅक्शन मोड'वर ; 'कचरामुक्त कसब्यासाठी पंधरा दिवसात आराखडा तयार करा'

By राजू हिंगे | Updated: November 27, 2024 18:25 IST

हेमंत रासने यांची पालिका प्रशासनाला सूचना

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ कचरामुक्त करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात नियोजन आराखडा तयार करावा, अशी सूचना आमदार हेमंत रासने यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. कचरामुक्त कसब्याचा निर्धार करत आमदार हेमंत रासने यांनी कामाला सुरूवात केली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत रासने यांनी सकाळी ७ वाजता संपूर्ण मतदारसंघात पाहणी केली.

यावेळी अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी., घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दूध भट्टी, गणेश पेठ, ताडीगुत्ता, गंज पेठ रोड तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील भिकारदास मारुती चौक आणि रमणबाग प्रशाला या ठिकाणांची पाहणी केली.हेमंत रासने म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक लढत असताना मतदारसंघातील नागरिकांना आपण विकासाचा पंचसूत्री उपक्रम राबविणार असल्याचा शब्द दिला आहे. यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कसबा घडवण्यासाठी विशेष आराखडा तयार करून कार्यवाही केली जाणार असून, पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली. कसबा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा असून, जगभरातून नागरिक येथे भेट देतात. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे.

 

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकसबा पेठElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा